दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पू्र्ण झाला. याबाबत अजूनही तपास सुरू आहे. आमदोर अमोल मिटकरी यांनी तपासाबाबत अनेकवेळा मागणीही केली आहे. दरम्यान, आता मिटकरी यांनी एक ट्विट केले, या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी नरेश अरोरा यांचा फोटो वापरला आहे. त्यांच्या विचारांची दखल घेऊन आता त्यांचा शोध घेण्याची वेळ आली असल्याचे म्हटले या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अजितदादांच्या विमान अपघातानंतर सध्या हे महाशय कुठे आहेत? असा सवाल मिटकरींनी केला. यांच्याकडे महाराष्ट्राच दुर्लक्ष होतय का? कारण त्यांचे विचार ऐकुन आता त्यांचा शोध महाराष्ट्राने घ्यायलाच पाहिजे, असंही या ट्विटमध्ये मिटकरी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठी कँपेनिंग करणारे डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी #शोधमोहिम अशी कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमुळे खळबळ उडाली आहे.
अमोल मिटकरी यांनी याबाबत माध्यामांना प्रतिक्रियाही दिल्या आहेत. नरेश अरोरा हे सर्व सांभाळायचे. त्यांनीच गुलाबी जॅकेट दादांना दिले. त्यांनी दादांना पुष्पगुछ देऊन त्यांच्या खांद्यावर हात टाकला होता. सगळ्या पक्षाची स्ट्रेटजी ते ठरवत होते. आता अजित दादांच्या निधनानंतर हे फक्त एक दोन दिवस दिसले आत्ता ते कुठे आहेत? असा प्रश्न मला पडला म्हणून मी ट्वीट केले, असेही मिटकरी म्हणाले.
देशात आहेत की बाहेर
"कारण ते महाराष्ट्रामध्ये आहेत की देशाबाहेर आहेत ते माहित नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर ते कुठे दिसले नाही. खरंतर ह्या आमच्या दु:खात त्यांनी सोबत राहायला हवं होतं, त्यांनी काही पोस्ट किंवा त्याबद्दल काही बोलायला हवं होतं, पण ते कुठे आहेत असा प्रश्न आम्हाला पडला आहे, आता त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना? आत्ता मला माहित नाही, ते मी असं बोलल्यावर आमच्या नेत्यांना विचारतील की आपल्या पक्षाचा आमदार असा कसा बोलतोय? थोडे ते नाराज होतील. पण मला त्यांचा काही फोन येत नाही, मी ही कधी करत नाही", असेही आमदार मिटकरी म्हणाले.
Web Summary : Amol Mitkari questions the whereabouts of Naresh Arora, a key strategist, after Ajit Pawar's plane scare. Mitkari emphasizes Arora's importance in past campaigns and expresses concern over his sudden disappearance, urging a search.
Web Summary : अजित पवार के विमान हादसे के बाद अमोल मिटकरी ने नरेश अरोड़ा के ठिकाने पर सवाल उठाया, जो एक प्रमुख रणनीतिकार थे। मिटकरी ने अतीत के अभियानों में अरोड़ा के महत्व पर जोर दिया और उनके अचानक गायब होने पर चिंता व्यक्त करते हुए उनकी खोज करने का आग्रह किया।