"दादा, आम्हाला माफ करा; आता आवाज काढावा इतका पण...", आमदार अमोल मिटकरींची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:19 IST2026-03-16T12:13:45+5:302026-03-16T12:19:55+5:30

Amol Mitkari post on Ajit Pawar: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांच्या अपघाती मृत्युचा मुद्दा चर्चिला जाईल असे बोलले जात होते, मात्र तसे काही झाले नाही. 

"Ajit Pawar, forgive us; now we have to raise our voice...", MLA Amol Mitkari's emotional post | "दादा, आम्हाला माफ करा; आता आवाज काढावा इतका पण...", आमदार अमोल मिटकरींची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट

"दादा, आम्हाला माफ करा; आता आवाज काढावा इतका पण...", आमदार अमोल मिटकरींची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट

"दादा, खरंच मोठ्या मनाने माफ करा. आम्ही कपाळ करंटे", असे भावनिक विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत अजित पवारांची माफी मागितली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांच्या अपघाती मृत्युबद्दल चर्चाच न झाल्याने आमदार मिटकरींनी तीव्र शब्दात नाराजी बोलून दाखवली. 

आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून सातत्याने अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्युच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी होत आहे. मात्र, विधान परिषदेबरोबरच विधानसभेतही याबद्दल फार चर्चा झालेली नाही. आमदार मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना याबद्दल अनेकदा खंत व्यक्त केली. त्यानंतर आता एक भावूक पोस्ट केली आहे. 

अदृश्य शक्ती चर्चा लाऊ देत नाही?

आमदार अमोल मिटकरींनी गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेची चर्चा तिसऱ्या आठवड्यात पण... दुर्दैवाने एकही ठोस चर्चा नाही. अदृश्य शक्ती चर्चा लाऊ देत नाही, अशी शंका उपस्थित करावी का, की सरकार झोपेत आहे?", असा संतप्त सवाल करत त्यांनी सरकार जागे व्हा, सत्य बाहेर आणा आणि जबाबदारी निश्चित करा", अशी मागणी केली आहे. 

'दादा, आम्हाला माफ करा' 
 
आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांची माफी मागणारी एक पोस्ट लिहिली आहे. "आदरणीय दादा, आम्हाला माफ करा. आता आवाज काढावा इतका पण आवाज शिल्लक नाही. लोकांच्या प्रपंचाला व सामान्य अतिसामान्य माणसाला न्याय देणारे तुम्ही दुर्दैवाने तुम्हालाच न्याय नाही", अशी खंत मिटकरींनी व्यक्त केली आहे. 

"आज इतर कुणासोबत अशी दुर्घटना घडली असती व तुम्ही आज असता तर सगळे सुतासारखे सरळ केले असते, व चर्चा लावली असती. मात्र, या मागील अदृश्य शक्ती ओळखता येत नाहीये. दादा, खरंच मोठ्या मनाने माफ करा. आम्ही कपाळ करंटे", अशा भावना मिटकरींनी व्यक्त केल्या आहेत.    

Web Title : विधायक मिटकरी का अजित पवार के लिए भावुक पोस्ट: 'हमें माफ करें, दादा'.

Web Summary : विधायक अमोल मिटकरी ने दिवंगत अजित पवार से माफी मांगी, विधानसभा में उनकी आकस्मिक मृत्यु पर चर्चा की कमी पर दुख व्यक्त किया। मिटकरी को संदेह है कि छिपी हुई ताकतें मामले की पूरी जांच को रोक रही हैं और उन्हें लगता है कि वे न्याय दिलाने में विफल रहे हैं।

Web Title : MLA Mitkari's emotional post to Ajit Pawar: 'Forgive us, Dada'.

Web Summary : MLA Amol Mitkari apologizes to the late Ajit Pawar, expressing grief over the lack of discussion regarding his accidental death in the assembly. Mitkari suspects hidden forces are preventing a thorough investigation into the matter and feels they have failed to deliver justice.