शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Mayday कॉल दिला अन् ३ सेकंदांत विमान क्रॅश, इंधनाचा स्फोट झाल्याने गेला सर्व प्रवाशांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:11 IST

Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच लोकांचा मृत्यू झालेल्या मे.व्हीएसआर कंपनीच्या व्हीटी-एसएसके लेझर जेट ४५ या विमानाचा उतरतेवेळी १०० फुटांवर असताना तोल गेला. त्यामुळे ते विमान विमानतळावर कोसळले आणि विमानातील इंधनाचा स्फोट झाला. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे आली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच लोकांचा मृत्यू झालेल्या मे.व्हीएसआर कंपनीच्या व्हीटी-एसएसके लेझर जेट ४५ या विमानाचा उतरतेवेळी १०० फुटांवर असताना तोल गेला. त्यामुळे ते विमान विमानतळावर कोसळले आणि विमानातील इंधनाचा स्फोट झाला. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे आली आहे.

यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) प्राप्त माहितीनुसार, या विमानाने बुधवारी सकाळी ८ वाजता मुंबईहून बारामतीसाठी उड्डाण केले. त्यानंतर सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी पुण्याच्या आसपास असताना वैमानिकाने बारामती विमान वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला आणि तेथील वातावरणाच्या स्थितीची विचारणा केली. त्यानंतर पुन्हा हे विमान जेव्हा हवेत बारामतीपासून ५५ किलोमीटर अंतरावर असताना त्यांनी पुन्हा बारामती एटीसीशी संपर्क केला असता, त्यांना वारा स्थिर असून, दृष्यमानता ३००० मीटर इतकी असल्याची माहिती देण्यात आली.

विमान ज्यावेळी बारामती विमानतळाच्या रन-वे ११ पाशी उतरण्यासाठी आले, त्यावेळी त्यांना कमी दृश्यमानतेमुळे रन-वे दिसला नाही, तशी माहिती वैमानिकांनी एटीसीला कळविली आणि विमानाने पहिल्यावेळी लँडिंग करण्याचे टाळले. विमानतळाभोवती एक चक्कर मारली आणि पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करताना एटीसीशी संपर्क साधला. एटीसीने त्यांना आता रन-वे दिसत आहे का, अशी विचारणा केली. मात्र, आम्हाला रन-वे दिसला की आम्ही संपर्क करू, असे वैमानिकाने एटीसीला कळविले.

MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...

एटीसीच्या सिग्नलला वैमानिकाचा प्रतिसाद नाहीपुढील काही क्षणांत वैमानिकाने रन-वे आम्हाला दिसत असल्याचे कळविले. त्यानुसार एटीसीने त्यांना उतरण्यासाठी हिरवा कंदील दिला. मात्र, एटीसीने दिलेल्या सिग्नलला वैमानिकाकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि ८ वाजून ४४ मिनिटांनी विमान कोसळून मोठा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले.  त्यानंतर विमानतळावर तैनात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तेथे तातडीने धाव घेतली. मात्र, तोवर काळाने घाला घातला होता. दरम्यान, आता या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अँक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो (एएआयबी) आणि डीजीसीएने सुरू केली आहे.

...तर टळला असता विमान अपघात, एक चूक महागातमुंबई : बारामती विमानतळ हा मुळात नियमित किंवा विमान वाहतूक क्षेत्राच्या भाषेत ‘शेड्युल विमानसेवा’ म्हणतात (मोठी विमाने) त्यासाठी वापरला जात नाही; कारण तशा सुविधा तिथे उपलब्ध नाहीत. विशेषतः इथे रात्री विमान उतरण्याची सोय नाही. रात्री विमान उतरण्याची सोय ज्या विमानतळावर असते, तिथे धावपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणावर लाइट लावलेले असतात. हे लाइट केवळ रात्रीच कामाला येतात असे नाही; तर ज्यावेळी दृश्यमानता कमी असते त्यावेळीही या लाइटच्या साहाय्याने वैमानिकाला विमान उतरण्यास मोठी मदत होते. जर अशी सुविधा बारामती विमानतळावर असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती.

या विमानाने केले होते १५ हजार तासांचे उड्डाणअपघातग्रस्त विमान हे कॅनडास्थित बम्बार्डियर एरोस्पेस कंपनीने २०१० यावर्षी बनविले होते. गेल्या १६ वर्षांपासून ते कार्यरत होते आणि या विमानाने आजवर १५ हजार तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण केले आहे. या विमानाला दोन इंजिन असून, या विमानाची प्रवासी संख्या ही आठ आहे. 

जवळच्या अंतरासाठी वेगाने आणि सुरक्षितरीत्या धावण्यासाठी जगात याची ओळख आहे. जगभरात या कंपनीची एकूण २७ विमाने आहेत. या विमानाचे डीजीसीएने फेब्रुवारी २०२५ मध्ये ऑडिट केले होते आणि या विमानाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला होता. या विमानाची वैद्यकीय सुरक्षा चाचणी १२ जुलै २०२५ रोजी झाली होती आणि तीची वैधता २४ जुलै २०२६ पर्यंत होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Plane Crash: Mayday Call, Fuel Explosion Kills All Passengers

Web Summary : Deputy Chief Minister among dead as Baramati plane crashes after Mayday call. Visibility issues and delayed response to signals led to the accident. Investigation started by AAIB and DGCA. The plane had flown for 15,000 hours.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीairplaneविमानDeathमृत्यू