शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

"जनता अन् आमदारांच्या मनातलं जाणून घेऊ, सुनेत्रा वहिनींशी बोलणं महत्त्वाचं.."- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:34 IST

धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करू. त्यानंतर जे काही आहे ते आम्ही ठरवू असं सांगत तटकरेंनी उपमुख्यमंत्रिपदावर भाष्य केले.

मुंबई - अजित पवार यांच्या निधनानंतर आता रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पुढच्या घडामोडींवर चर्चा करण्यात आली. सध्या आम्ही शोकाकुल वातावरणात आहोत. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप काही चर्चा नाही असा खुलासा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे राष्ट्रवादी कार्यालयात पोहचले होते. त्याठिकाणी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. तटकरे म्हणाले की, अजितदादांच्या अकाली जाण्याचा आम्हाला धक्का बसला आहे. या धक्क्यातून आम्ही कुणी सावरलो नाही. अजूनही अजितदादा आमच्यातच आहे असं वाटतंय. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे क्लेशदायक आहे. ज्या कार्यालयातून अजित पवारांनी पक्षाचे संघटन उभे केले तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे याच भावनेतून मी इथे आलो होतो. माझी कुठलीही पत्रकार परिषद नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा वहिनी आणि परिवार धार्मिक विधीत आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करू. त्यानंतर जे काही आहे ते आम्ही ठरवू. जनतेच्या मनातलं, आमदारांच्या मनातलं आम्ही जाणून घेऊ. वहिनींशी बोलणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही प्रत्येक कृती संवेदनशीलपणे करू असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजितदादांनी ज्यारितीने महाराष्ट्र घडवला त्यामुळे आज त्यांच्या निधनाने राज्य शोकमग्न आहे. दादांचे विविध पैलू महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यामुळे त्याच शोकाकुल वातावरणात आम्ही आहोत. मुख्यमंत्र्‍यांची भेट झाली पण बाकीचा जो विषय असेल त्याबाबत कुठलीही चर्चा नाही असं सांगत सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunil Tatkare: Important to know people, MLAs' minds, talk to Sunetra.

Web Summary : Following Ajit Pawar's death, Sunil Tatkare met Devendra Fadnavis and emphasized consulting Sunetra Pawar and understanding public sentiment before making any decisions about the vacant Deputy Chief Minister post. Discussions are postponed due to mourning.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारsunil tatkareसुनील तटकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस