शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

"अजित पवारांशी बोलणं करून देते..."; विमान अपघातात जीव गमावणाऱ्या पिंकीने वडिलांना दिला होता शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:24 IST

Plane Crash in Baramati: फ्लाईटमध्ये गेल्यानंतर अजित पवारांशी तुमचं बोलणं करून देईन असं तिने वडिलांना सांगितले होते.

मुंबई - बारामती येथे भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. अजित पवारांसोबत विमानात प्रवास करणाऱ्यांमध्ये पिंकी माली या तरुणीचाही समावेश होता. या अपघातात अजित पवारांसह अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यातील महिला फ्लाईट अटेन्डेंट पिंकी माली हिचेही निधन झाले आहे. पिंकी माळी अजित पवारांसह चौथ्यांदा विमान प्रवास करत होती. मात्र २८ जानेवारीची सकाळ तिच्या आयुष्यातील अखेरची ठरली. 

कोण होती पिंकी माली?

पिंकी माली २९ वर्षाची होती. ती वरळीतील सेन्चुरी मिलजवळील क्वार्टरमध्ये राहत होती. पिंकीच्या निधनानंतर तिच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. तिचे वडील शिवकुमार माली म्हणाले की, पिंकी खूप आनंदी होती. फ्लाईटमध्ये गेल्यानंतर अजित पवारांशी तुमचं बोलणं करून देईन असं तिने म्हटलं होते. सकाळी तिने भावाला कॉल केला होता. त्यावेळी ती दौऱ्यावर जात होती. मात्र त्यानंतर तिच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही असं तिच्या घरच्यांनी सांगितले.

तर पिंकी मालीसोबत अखेरच्या संवादात ती बारामतीहून नांदेडला जाणार होती असं कुटुंबाला सांगितले. पिंकी माळी अजित पवारांसोबत दौरा करताना खूप आनंदी होती. मात्र पिंकीचा हा आनंद आता तिच्या कुटुंबापासून हिरावून घेतला आहे. या विमान अपघातानंतर तिचे घरचे आणि नातेवाईकांवर मोठा आघात झाला. पिंकीचे वडील शिवकुमार माली हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आहेत.  पिंकी मालीचे वडील शिवकुमार हे लहानपणापासून मुंबईत वाढले आहेत. मागील ८ वर्षापासून त्यांची लेक एअर हॉस्टेस म्हणून काम करत होती. 

प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना

दरम्यान, बारामतीतील विमान अपघात किती भयानक होता याचा अंदाज तिथल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या गोष्टीवरुन येते. मी माझ्या डोळ्याने पाहिले, विमान खाली येत होते. ते खाली कोसळणार असे वाटत होते आणि तेच झाले. विमान खाली कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. आम्ही घटनास्थळाच्या दिशेने धावलो. तिथे आग लागली होती. काही जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते परंतु आग इतकी जास्त होती की कुणाला मदत करता आली नाही. अजित पवार या विमानात प्रवास करत होते. ते आमच्यासाठी खूप वेदनादायी होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : "I'll arrange a talk with Ajit Pawar," Pinky promised.

Web Summary : Pinky Mali, a flight attendant, died in the Baramati plane crash alongside Ajit Pawar. She promised her father she would introduce him to Pawar during the flight. The crash claimed five lives, devastating Pinky's family.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटना