'त्या' प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, चंद्रकात पाटलांना चक्क 'चंपा'च म्हटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 08:45 AM2019-10-10T08:45:22+5:302019-10-10T08:46:32+5:30

चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे, अप म्हणजे कसं अजित पवार तसं चंपा.

Ajit Pawar' critics on chandrakant patil with name of champa in pune press | 'त्या' प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, चंद्रकात पाटलांना चक्क 'चंपा'च म्हटले

'त्या' प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, चंद्रकात पाटलांना चक्क 'चंपा'च म्हटले

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चांगलीच खिल्ली उडवली. सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधक कार्यकर्त्यांकडून ज्याप्रमाणे खिल्ली उडविण्यात येते त्याचप्रमाणे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख केला. पवार कुटुंबीयातील तरुण भविष्यात भाजपामध्ये येऊ शकतात, आणि आले तर त्यांचे स्वागत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरुन अजित पवारांना पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्यावेळी, अजित पवारांनी थेट चंपा असाच उल्लेख चंद्रकांत पाटील यांचा केला. 

चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे, अप म्हणजे कसं अजित पवार तसं चंपा. ते जे काही म्हणतात त्याला काहीही अर्थ नाही. ते शऱद पवार यांनाही राजकारणातून बाजूला जातील म्हणतात. तुम्हाला तरी पटतं का? असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. पवारसाहेब कधी राजकारणातून बाहेर जातील का, त्यांनी किती चढ-उतार पाहिलेत. 55 पैकी केवळ 5 आमदार उरल्यानंतरही ते तितक्यात तडतडीत बाहेर पडले. आजही, किती आक्रमकपणे ते महाराष्ट्रात आपली भूमिका मांडतायंत. मला हे सरकार बदलायचंय असं सांगत महाराष्ट्रभर फिरतायंत, असे सांगत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं.

दरम्यान, भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी आघाडीतर्फे काही उमेदवारांना पुरस्कृत केले तर काही अपक्षांना पाठिंबा दिला आहे. निवडून येणे हे एकच ध्येय असून, आघाडीचे 175 आमदार निवडून येतील, अशी खात्री असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे राष्ट्रवादीची बुधवारी बैठक झाली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.

Web Title: Ajit Pawar' critics on chandrakant patil with name of champa in pune press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.