शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:04 IST

Ajit pawar NCP Candidate List: मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मविआ सरकारच्या काळात मलिक यांना मनी लाँड्रिंगमध्ये ईडीने अटकही केली होती.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसमधून आलेल्या दोन जणांसह 38 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचे नाव पहिल्या यादीत घेण्याचे टाळण्यात आले आहे. भाजपाचा मलिक किंवा मलिक यांच्या मुलीला उमेदवारी देण्यास विरोध आहे. यामुळे राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे. 

मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मविआ सरकारच्या काळात मलिक यांना मनी लाँड्रिंगमध्ये ईडीने अटकही केली होती. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधीत कोणालाही तिकीट दिले तर ते स्वीकारले जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांची मलिकांचे नाव नसलेली यादी आली आहे. 

नवाब मलिक दोन वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आले होते. तेव्हापासून ते अजित पवार गटासोबत आहेत. अनेकदा ते विधानसभेतही सत्ताधारी बाकावर बसलेले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही मलिक यांनी मतदान केलेले आहे. मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाने कडाडून विरोध केला होता, तरीही अजित पवारांनी मलिकांना सोबत घेतले होते. यामुळे आताच्या विधानसभेला नवाब मलिकांना उमेदवारी देणार का याकडे भाजपाचे लक्ष लागले आहे. अजित पवार हे मलिक यांची कन्या सना मलिक यांना उमेदवार बनवू शकतात, यालाही भाजपाने विरोध केला आहे. 

 अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही पहिली उमेदवार यादी जाहीर करत ३८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याची माहिती देण्यात आली असून राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवार यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे. 

अशी आहे यादी...१. बारामती - अजित पवार २. येवला - छगन भुजबळ ३. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील ४  कागल - हसन मुश्रीफ ५. परळी - धनंजय मुंडे ६. दिंडोरी - नरहरी झिरवाळ  ७.अहेरी - धर्मराव बाबा आत्राम८. श्रीवर्धन - आदिती तटकरे ९. अंमळनेर - अनिल भाईदास पाटील १०. उदगीर- संजय बनसोडे ११. अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले १२. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके १३ वाई - मकरंद पाटील१४.सिन्नर- माणिकराव कोकाटे १५. खेड आळंदी- दिलीप मोहिते १६. अहमदनगर शहर- संग्राम जगताप१७. इंदापूर - दत्तात्रय भरणे १८.अहमदपूर- बाबासाहेब पाटील १९. शहापूर - दौलत दरोडा २०. पिंपरी- अण्णा बनसोडे २१. कळवण- नितीन पवार२२. कोपरगाव- आशुतोष काळे २३.अकोले- डॉ. किरण लहामटे २४. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे २५. चिपळूण- शेखर निकम २६. मावळ- सुनील शेळके २७. जुन्नर- अतुल बेनके २८.मोहोळ- यशवंत विठ्ठल माने २९. हडपसर- चेतन तुपे ३०. देवळाली- सरोज आहिरे ३१. चंदगड- राजेश पाटील ३२. इगतपुरी- हिरामण खोसकर ३३. तुमसर- राजू कारेमोरे ३४. पुसद- इंद्रनील नाईक ३५. अमरावती शहर- सुलभा खोडके ३६. नवापुर-भरत गावित३७. पाथरी- निर्मला उत्तमराव विटेकर३८. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४anushakti-nagar-acअणुशक्ती नगरmankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगरBJPभाजपा