शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 22:18 IST

Maharashtra Exit Poll 2024 : 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता आहे...

महाराष्ट्र विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर,  आता एक्झिट पोलही आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलचे आकडे महायुतीसाठी आनंदाच्या बातमीचे संकेत देत आहेत. यांपैकी मॅट्रीजच्या आकडेवारीनुसार, राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) यांचे 'ट्रिपल इंजिन' अथवा 'तिकडी' 170 जागा जिंकू शकते. महत्वाचे म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महायुती 175 जागांच्या जवळपास जागा जिंकेल, अशी भविष्यवाणी केली होती.

महायुतीच्या 'ट्रिपल इंजिन'ला किती जागा?मॅट्रीजच्या Exit Poll नुसार, राज्यातील 288 जागांपैकी महायुती 150 ते 170 जागा मिळत आहेत. यांपैकी भाजपाला 89 ते 101, शिवसेने (एकनाथ शिंदे) 37 ते 45 आणि एनसीपी (अजित पवार) 17 ते 26 जागा जिंकू शकते. 

महाविकास आघाडीला किती जागा -तर, महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळत आहेत. यात काँग्रेसला 39 ते 47, शिवसेना ठाकरे गटाला 21 ते 29 आणि एनसीपी (शरदचंद्र पवार) 35 ते 43 जिंकू शकतात. महत्वाचे म्हणजे 2019 मध्ये भाजपा आणि अखंड शिवसेना एकत्रित लढले होते. मात्र नंतर, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि एनसीपीसोबत जाऊन सरकार स्थापन केले होते.

अजित पवारांची भविष्यवाणी -तत्पूर्वी, प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीला मिळणाऱ्या जागांसंदर्भात अंदाज व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य आम्ही समोर ठेवले आहे. एवढेच नाही, तर त्यासाठी महायुतीमधील प्रत्येक घटकपक्ष प्रयत्नशील आहे. तशा पद्धतीने आमचे काम सुरू आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले होते. 

सर्व प्रमुख एक्झिट पोल एका क्लिकवरhttps://www.lokmat.com/elections/maharashtra-assembly-election-2024/exit-poll/याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द वीकला दिलेल्या मुलाखतीतही सत्ताधारी महायुती 175 जागांच्या जवळपास जागा जिंकू शकते, असा दावा केला होता. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे