Ahmedabad Plane Crash : अपघाताचे कारण ‘लॉस ऑफ लिफ्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:06 IST2025-06-13T09:03:07+5:302025-06-13T09:06:50+5:30
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद येथून गुरुवारी दुपारी टेक ऑफ घेताच अपघातग्रस्त झालेल्या विमानातील इलेक्ट्रीक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने विमानातील ‘प्रेशर सिस्टीम’ ड्रॉप झाली असावी. परिणामी, विमानाचे फ्लॅप अपेक्षेनुसार ३० ते ४० डीग्रीपर्यंत खाली न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे प्राथमिक अनुमान काढता येईल.

Ahmedabad Plane Crash : अपघाताचे कारण ‘लॉस ऑफ लिफ्ट'
- कुणाल गायकवाड
अहमदाबाद येथून गुरुवारी दुपारी टेक ऑफ घेताच अपघातग्रस्त झालेल्या विमानातील इलेक्ट्रीक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने विमानातील ‘प्रेशर सिस्टीम’ ड्रॉप झाली असावी. परिणामी, विमानाचे फ्लॅप अपेक्षेनुसार ३० ते ४० डीग्रीपर्यंत खाली न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे प्राथमिक अनुमान काढता येईल. ज्या विमानाला अपघात झाला ते बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे अत्याधुनिक प्रकारात मोडते. अपघाताचे व्हिडिओ पाहाता, विमानाचे फ्लॅप वरच दिसत आहेत. खरे तर टेक ऑफच्या वेळी ते साधारण ३० ते ४० डिग्रीपर्यंत खाली असायला हवेत. पण, तसे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे हवेचा दाब कमी होऊन पॉवर फेल आणि त्यातून ‘लॉस ऑफ’ लिफ्ट होऊन ते लगेचच कोसळले असावे. टेक ऑफ नंतर ६२५ फुटांवर असलेले हे विमान फूल थ्रोटल देऊन देखील हवेचा दाब आवश्यक तेवढा वाढवू शकले नसेल असे प्रथमदर्शनी वाटते. अर्थात, विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती आल्यावर नेमके कारण समोर येईल.
विमानाने जास्त उंची गाठलेली नसल्याने कुठल्याही प्रकारच्या कम्युनिकेशनला वेळ मिळाला नसावा. त्यातच विमानात इंधन पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने अपघाताची तीव्रता वाढलेली दिसते. आजूबाजूला मोकळे मैदान किंवा पाणी असते तर अपघाताची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाली असती.