शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

जालन्याच्या आखाड्यात; पुन्हा खोतकर-गोरंट्यालांचा सामना रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 10:37 AM

दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट झाला असल्याने, पुन्हा विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल यांच्यातील सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई - जालना, औरंगाबाद विधान परिषद निवडणुकीत युतीकडून ऐनवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव निश्चित झाल्याने, आगामी विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातील लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. गेल्यावेळी केवळ २९६ मतांच्या फरकाने खोतकर निवडून आले होते. त्यामुळे यावेळी ही लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात चुरशीच्या लढतींपैकी एक असलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत यावेळी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र ऐनवेळी जालना, औरंगाबाद विधान परिषद निवडणुकीत दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट झाला असल्याने, पुन्हा विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल यांच्यातील सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट?

जालना विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेत अत्यंत चुरशीची ठरते. २००९ मध्ये कैलास गोरंट्याल या मतदार संघातून आमदार होते. त्यावेळी खोतकर यांनी घनसावंगी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, २०१४ मध्ये खोतकर पुन्हा जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी जेमतेम २९६ मतांनी गोरंट्याल यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. मात्र यावेळी युती आणि आघाडी होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे यावेळी खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

राजकरण तापले

जालना पालिकेच्या विविध विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार अर्जुन खोतकर यांचे भाचे नीलेश हरिष शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २६ जून रोजी केली होती. यामुळे मुख्यमंत्री कक्ष कार्यालयाने विभागीय आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझ्यावर वैयक्तिक स्वरुपाचे गैरव्यवहाराचे आरोप राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे त्यांच्या भाच्याला समोर करुन करत असल्याचा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला होता.

तर जालना पालिका म्हणजे गोरंट्याल यांची खाजगी मालमत्ता असल्या सारखा व्यवहार करत आहेत. तेथील वेगवेगळ्या विभागांतील बिलांची माहिती काढल्यावर मोठे धक्कादायक प्रकार पुढे आले आहेत. यावर आम्ही गप्प बसणे म्हणजे जालन्यातील जनेतेचा विश्वासघात केल्यासारखे होणार आहे. त्यामुळेच आम्ही चौकशीची मागणी केली आहे. त्या चौकशीतून जे वास्तव पुढे येईल, ते आम्हालाही मान्य राहील. त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे आरोप आपण करत आहोत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. असे प्रतिउत्तर खोतकर यांनी दिले होते. त्यामुळे जालना जिल्ह्यातील राजकरण विधानसभा निवडणुकीच्या आधीच तापताना दिसत आहे.