पवारांनंतर आता संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीनं केला फोन; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 12:32 IST2023-06-09T12:31:45+5:302023-06-09T12:32:50+5:30

ही धमकी एका फोन कॉलच्या माध्यमाने देण्यात आली असल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे.

After sharad Pawar, Sanjay Raut has also been threatened, an unknown person called | पवारांनंतर आता संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीनं केला फोन; म्हणाली...

पवारांनंतर आता संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीनं केला फोन; म्हणाली...

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर, आता शिवसेना (उबाठा गट ) खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी एका फोन कॉलच्या माध्यमाने देण्यात आली असल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे.

सुनील राऊत म्हणाले, माझ्या मोबाइलवर कॉल करून मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यात, संजय राऊतांना सांगा की, रोज सकाळी माध्यमांसोबत बोलणे बंद करा. नाही तर, तुम्हाला आणि संजय राऊत यांना, दोघांनाही जीवे मारू, अशी धमकी देण्यात आली आहे.

संजय राऊतांना आलेला धमकीचा फोन कॉल सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात धमकी देणारी व्यक्ती संजय राऊतांना सकाळची पत्रकार परिषदत बंद करायला सांगत आहे. तसेच न ऐकल्यास गोळी मारण्याची धमकी देत आहे. 

शरद पवारांनाही जीवे मारण्याची धमकी - 
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल आहे. ट्विटच्या माध्यमाने ही धमकी देण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरून पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले आहे. या दोन ट्विटर हँडलवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच या व्यक्तींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: After sharad Pawar, Sanjay Raut has also been threatened, an unknown person called