शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

weather: गारांनंतर वाढला पारा, चाळिशीपुढे गेलेल्या शहरांची ‘लाहीलाही’, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 07:07 IST

weather: उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गुरुवारसाठी मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्माघाताचे प्रकार वाढत असून सातारा जिल्ह्यात दोन दिवसांत चार जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.

विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अशा जिल्ह्यांत २२ एप्रिलपासून वळवाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे. खान्देश, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अक्षय तृतीयेनंतरही वळवाच्या वातावरणाचा परिणाम टिकून राहील. मराठवाड्यात गुरुवारी गारपिटीची शक्यता आहे. विदर्भात अवकाळी वातावरण गुरुवारपासून डोकावणार असून, ५ ते ७ दिवस टिकून राहील.      - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

ही घ्या काळजी n शक्यतो उन्हाच्या आधी महत्त्वाची कामे आटोपाn तीव्र उन्हात बाहेर जाताना रुमाल, छत्री, सनगॉगल वापरा. n पाण्याची बाटली बाळगा. n भरपूर पाणी प्या n कूलर किंवा एसीतून एकदम उन्हात जाणे किंवा उन्हातून एकदम एसी कूलरच्या गारव्यात जाणे टाळा.

कोणते जिल्हे होरपळत आहेत?रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

गारव्यासाठी वाढली विजेची मागणी : मुंबईसह राज्यभरात वाढत्या उकाड्यामुळे पंखा, एसी आणि कूलरचा वापरही वाढला आहे. परिणामी विजेच्या मागणीत वाढ होत आहे. मंगळवारी राज्यभरातून सुमारे २८ हजार मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. दुपारपर्यंत मुंबई वगळता राज्यभरातून २३ हजार ७८५ मेगावॅट,  दुपारी ४ वाजेपर्यंत २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंद झाली. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीजवाहिन्यांच्या जाळ्यावरून बुधवारी २ हजार ४२ मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. तर १ हजार ८४० मेगावॉटचा पुरवठा करण्यात आला.

शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती  वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडिया यांनी दिली.

राज्यभरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्येसोलापूर     ४२.२ ठाणे बेलापूर     ४२ मालेगाव     ४२ जळगाव     ४१.९ जालना     ४१.७ परभणी     ४१.५ बीड     ४१.५ धाराशिव     ४०.३ पुणे     ४० सातारा     ३९.९ बारामती     ३९.६ कोल्हापूर     ३९.५ सांगली     ३९.७ अहमदनगर     ३९.७ नाशिक     ३८.८ मुंबई     ३८.८ लोणावळा     ३७माथेरान     ३६.४ 

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र