शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

कुमारीमाता २१ वर्षांनंतरही वाऱ्यावरच, शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 7:07 AM

एनजीओंचा विकास, पीडित तशाच । शासन, आयोग, विद्यापीठही सर्वेक्षणावरच समाधानी

अविनाश साबापुरे

यवतमाळ : फुलपाखराचे मन आणि रानफुलांचे वन लाभलेल्या शेकडो अजाण मुलींना संधीसाधूंनी क्षणिक मोहासाठी लुटले. आणि पोटुशी झाल्यावर वाºयावर सोडले. पोरवयातच लेकूरवाळ्या झालेल्या या अभागी मुलींना समाज ‘कुमारी माता’ हे उदात्त बिरुद चिटकवून मोकळा झाला. पण शासन आणि महिला आयोग केवळ पाहणी, आढावा आणि सर्वेक्षण करून थांबले आहेत.

झरी जामणी तालुक्यातील (जि. यवतमाळ) हा प्रश्न गेल्या २१ वर्षांपासून चरचरत आहे. ठेकेदार, तेलंगणातून येणारे ट्रक चालक, सावकार व गुंड-पुंडांनी अल्पवयीन मुलींना भोगले. कुडा-मातीच्या टीचभर झोपडीत राहणाºया या मुलींना जंगल नवे नाही. इतरांना मदत करणे, सर्वांशी प्रामाणिक राहणे हा या समाजाचा मूळ स्वभाव आहे. तोच हेरून अगदी दहा रुपयांचे आमिष दाखवून मुलींच्या अब्रूचा खेळ केला. तर शिक्षणाचा अभाव असल्याने, पीडित मुलींनाही अनेक दिवस आपण बळी ठरल्याची जाणच नव्हती. घरातल्या मंडळींनीही सुरवातीला आरडाओरड करून नंतर ‘हे असे गरिबांसोबत घडतच असते’ अशी स्वत:ची समजूत घालून घेतली.गेल्या २५-३० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पण १९९७ पासून प्रसिद्धी माध्यमांनी ‘कुमारी मातां’चा हा प्रश्न जगापुढे आणला. त्यानंतर मुंबई-पुण्याच्या नेत्यांपासून तर महिला आयोगाच्या पदाधिकाºयांनी दौरे केले. सरकारने आकडेवारी गोळा केली. महिला आयोगानेही सर्वेक्षण केले. शासन आजही येथे ४८ कुमारी माता असल्याचे सांगते, पण गावकºयांच्या मते हा आकडा शंभराहून अधिक आहे.कोणीबी याचं, नाव लिवाचं... द्याचं काईच नाईशासनाचे प्रतिनिधी, अधिकारी, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी प्रश्न विचारतात आणि जातात. आपल्यासाठी काहीच करीत नाही, या भावनेतून झरीवासी प्रतिसादही द्यायला तयार नाही. ‘कोणीबी याचं नाव लिवाचं. द्याचं काईच नाई. कोणी मन्ते पोराले धरून फोटो काढ. कोणी मन्ते घरासंग उभी राहून फोटो काढू दे...’ अशा शब्दात एका कुमारी मातेने आपला संताप सदर प्रतिनिधीकडे व्यक्त केला.‘त्या’ कोवळ्या जीवांचे काय?कुमारीमातांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांचा गंभीर प्रश्न आहे. अल्पवयात प्रसुत झालेल्या या मातांना बाळांची काळजी कशी घ्यावी, हेही निट ठाऊक नसते. ज्यांची मुले कशीबशी मोठी झाली, त्यांच्या शिक्षणाचा मोठा पेच आहे. शाळेत नाव टाकायचे तर बापाचे नाव हवे असते, जातीचा दाखला हवा असतो. काही जणींनी आजोबाचे (स्वत:च्याच वडिलाचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. तर काही जणींनी बापाच्या ऐवजी स्वत:चेच (आईचे) नाव लावून मुलाला शाळेत घातले. पण शाळेत गेल्यावरही ‘तुझा बाप कोण’ हा प्रश्न या मुलांना जगणे नकोसे करतोच.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला