शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुरग्रस्त विद्यार्थ्यांना ‘कृषी’च्या तिसऱ्या फेरीत मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 15:16 IST

दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड होऊनही महाविद्यालयात जाऊ न शकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल..

ठळक मुद्देराज्यातील चार कृषी विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी (दि. १२) अंतिम मुदत

पुणे : अतिवृष्टी, महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे शक्य झालेले नाही. त्यामुळे राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रवेश फेरीत संधी दिली जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड होऊनही महाविद्यालयात जाऊ न शकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल, अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिली.राज्यातील चार कृषी विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमधील बीएससी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या यांसह आठ पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कृषी परिषदेमार्फत राबविली जात आहे. राज्यात एकुण ११ हजार ७३० प्रवेश क्षमता आहे. या प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी (दि. १२) अंतिम मुदत आहे. तर तिसरी फेरी दि. १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, राज्यातील विविध भागात झालेली अतिवृष्टी तसेच सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झालेले नाही. त्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची टांगती तलवार आहे. पण परिषदेने या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना कौसडीकर म्हणाले, महापुर तसेच अतिवृष्टीमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी दुसºया फेरीची मुदत दि. १३ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. पण त्यानंतर या फेरीत निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता आलेला नाही. सांगली व कोल्हापुरमधील विद्यार्थी बाहेर जाऊ शकले नाहीत. तर इतर जिल्ह्यातील विद्यार्थी याभागात येऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी निवड होऊनही प्रवेश घेतले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसºया फेरीमध्ये संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या  फेरीत मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश द्यायचा की प्रक्रियेनुसार प्रवेश द्यावा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्रवेश घेतलेल्या किंवा प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशासाठी दि. १९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर पीएचडीची दि. १० ऑगस्ट रोजी होणारी प्रवेश परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे कौसडीकर यांनी सांगितले.----------

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीfloodपूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी