शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

Maratha Reservation: मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा आणि...;  ॲड. पुरुषोत्तम खेडेकरांनी सरकारला सुचवला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 1:33 PM

मराठा सेवा संघाची, संभाजी ब्रिगेडची भूमिका ठरलेली आहे. आमची मागणी हीच राहील, की राज्य सरकारने पुन्हा गायकवाड आयोगाच्या आधारावर मंत्रीमंडळाची बैठक घेऊन मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा.

मुंबई - राज्यातील अत्यंत संवेदनशील अशा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यानंतर, आता मराठा समाजातील पुढाऱ्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. यातच, "मराठा समाजाचा समावेश सरसगट ओबीसींमध्ये करणे, हाच एकमेव पर्याय आहे," असे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर (Adv. Purushottam Khedekar) यांनी म्हटले आहे. (Adv. Purushottam Khedekar suggested to the state government about Maratha Reservation)

हा कायदा टिकणार नाही, हे सुरवातीपासूनच अपेक्षीत होते -खेडेकर म्हणाले, "मराठा समाजाचा समावेश सरसगट ओबीसींमध्ये करणे, हा एकमेव पर्याय आहे आणि महाराष्ट्र सरकारने गायकवाड आयोगानुसार हे केले असते आणि टक्केवारी वाढविली असती तर कदाचीत ते टिकले असते. एसईबीसी कॅटेगिरी आणि हा कायदा टिकणार नाही, हे आम्हाला सुरवातीपासूनच अपेक्षीत होते. त्यामुळे आम्ही त्याचा कधी जाहीर विरोधही केला नाही आणि समर्थनही केले नाही. हे आम्हाला अनपेक्षीत नाही. 

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकालमराठा सेवा संघाची भूमिका ठरलेली आहे - याच बरोबर, मराठा सेवा संघाची, संभाजी ब्रिगेडची भूमिका ठरलेली आहे. आमची मागणी हीच राहील, की राज्य सरकारने पुन्हा गायकवाड आयोगाच्या आधारावर मंत्रीमंडळाची बैठक घेऊन मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा. एक वेगळी कॅटेगरी करून सध्याच्या आरक्षणातील काही भाग मराठा समाजाला द्यावा आणि अतिरिक्त टक्केवारी वाढवावी हा पर्याय आहे. तसेच त्याला जेव्हा चॅलेन्ज होईल तेव्हा होईल, असेही पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.

ठाकरे सरकारने मराठा आरक्षण कुल्ड आणि किल्ड डाऊन केले - मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही हे राज्य सरकारचे अपयश आहे. उच्च न्यायालयात फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकविले. महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाला ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण का हवे हे पटवून देता आलेले नाही. यामुळे मी सरकारचा निषेध करतो. तसेच, मराठा समाजाच्या तरुण-तरुणींनी एकत्र येऊन राज्य सरकारला यावर जाब विचारायला हवा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

Maratha Reservation: ठाकरे सरकारने मराठा आरक्षण कुल्ड आणि किल्ड डाऊन केले; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराश करणारा -या विषयावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील कायदेतज्ज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज आपण न्यायालयात उभी केली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे," असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणpurushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकरmaratha mahasanghमराठा महासंघsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय