शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 20:03 IST

राज्यातील ४१७ शासकीय व ५०२ खासगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

ठळक मुद्दे एकुण ८२ ट्रेडसाठी ही प्रक्रिया असून १ लाख ३७ हजार ३०० प्रवेश क्षमता या प्रक्रियेअंतर्गत एकुण चार नियमित व एक समुपदेशन फेरी होणार प्रत्येक फेरीसाठी स्वतंत्र निवड यादी प्रसिध्द करून गुणवत्तेच्या आधारे प्रवेश

पुणे : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया येत्या सोमवार (दि. ३) पासून सुरू होणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्तळावर सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज भरता येईल. विभागाने निश्चित केलेल्या अर्ज स्वीकृती केंद्रांवर विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका मिळेल. राज्यातील ४१७ शासकीय व ५०२ खासगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेता येणार नाही. एकुण ८२ ट्रेडसाठी ही प्रक्रिया असून १ लाख ३७ हजार ३०० प्रवेश क्षमता आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकुण चार नियमित व एक समुपदेशन फेरी होणार आहे. विद्यार्थ्यांना दि. ३० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. पहिल्या प्रवेश फेरीची अंतिम गुणवत्ता यादी दि. ९ जुलै रोजी प्रसिध्द होईल. त्यानंतर प्रत्येक फेरीसाठी स्वतंत्र निवड यादी प्रसिध्द करून गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातील. नियमित चार फेऱ्यांची प्रक्रिया दि. १० ऑगस्टपर्यंत पुर्ण केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी संस्थांमध्ये दि. ३ ते ३० जूनदरम्यान दररोज सकाळी १० ते ११ यावेळेत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच संचालनालयाने अर्ज स्विकृती केंद्र निश्चित केली आहेत. याठिकाणी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका मिळेल. तसेच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी करणे, स्विकृती आणि निश्चिती करता येईल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अजार्ची छापील प्रत घ्यावी लागले. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करता येईल. प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.------------संकेतस्थळ - https://nvshq.org/admission/dvet-maharashtra-iti-admission-application-form/-----------आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रकऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती, छापिल प्रत घेणे - दि. ३ ते ३० जूनप्रवेश अर्ज निश्चित करणे - दि. ६ जून ते १ जुलैपहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे - दि. ६ जून ते १ जुलैप्राथमिक गुणवत्ता यादी - दि. ४ जुलैगुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे - दि. ४ व ५ जुलैअंतिम गुणवत्ता यादी - दि. ९ जुलैनिवड यादी- दि. १० जुलैनिवड यादीनुसार प्रवेश घेणे - दि. ११ ते १५ जुलैदुसºया प्रवेश फेरीसाठी पर्याय व प्राधान्य सादर करणे - दि. १२ ते १६ जुलैदुसरी निवड यादी - दि. १९ जुलैनिवड यादीनुसार प्रवेश घेणे - दि. २० ते २४ जुलैतिसºया प्रवेश फेरीसाठी पर्याय व प्राधान्य सादर करणे - दि. २१ ते २५ जुलैतिसरी निवड यादी - दि. २९ जुलैनिवड यादीनुसा प्रवेश घेणे - दि. ३० जुलै ते २ ऑगस्टचौथ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय व प्राधान्य सादर करणे - दि. ३१ जुलै ते ३ ऑगस्टचौथी निवड यादी - दि. ६ ऑगस्टनिवड यादीनुसार प्रवेश घेणे - दि. ७ ते १० ऑगस्टनव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश निश्चिती - दि. २२ जुलै ते १० ऑगस्ट समुपदेशन फेरीसाठी गुणवत्ता यादी - दि. १३ ऑ गस्टशासकीय संस्थांसाठी समुपदेशन फेरी दि. १२ ते १८ ऑगस्टखासगी संस्थास्तरावरील प्रवेश - दि. १० जुलै ते ३१ ऑगस्ट 

टॅग्स :Puneपुणेiti collegeआयटीआय कॉलेजonlineऑनलाइन