Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंनाच १०० खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार; रामदास कदमांचा थेट हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 15:38 IST2022-09-18T15:37:25+5:302022-09-18T15:38:35+5:30
आदित्य ठाकरे यांनाच १०० खोके घेण्याची सवय आहे, असा आरोप रामदास कदम यांनी जाहीर सभेत केला आहे. ते दापोलीत बोलत होते.

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंनाच १०० खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार; रामदास कदमांचा थेट हल्ला!
दापोली-
शिंदे गटातील आमदारांविरोधात '५० खोके, एकदम ओके' अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या आमदारांकडून वारंवार टीका केली जात असताना आता शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनाच १०० खोके घेण्याची सवय आहे, असा आरोप रामदास कदम यांनी जाहीर सभेत केला आहे. ते दापोलीत बोलत होते.
दापोलीत आज शिंदे गटाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला केला. आदित्य ठाकरे यांनाच १०० खोके घेण्याची सवय असून त्यांची पोलखोल करणार असल्याचं रामदास कदम म्हणाले.
राज्यात आता ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसंच दसरा मेळाव्यावरुनही दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून चढाओढीचं राजकारण पाहायला मिळत आहे. यातच आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदारांवर सातत्यानं निशाणा साधत आहेत आणि त्यांचा गद्दार असा उल्लेख करत आहेत. शिंदे गटातील आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप होत असताना आता रामदास कदम यांनी थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसंच चिपळूणचे शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांचा उल्लेख रामदास कदम यांनी चिपळूणचा नाच्या असा केला.