चिपळूण-पनवेल रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 07:15 IST2025-08-27T07:14:28+5:302025-08-27T07:15:51+5:30
Konkan Railway News: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-पनवेल–चिपळूण दरम्यान दोन मेमू अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

चिपळूण-पनवेल रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू
नवी मुंबई - गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-पनवेल–चिपळूण दरम्यान दोन मेमू अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. यात गाडी क्र. ०११६० चिपळूण-पनवेल ही मेमू विशेष ३ आणि ४ सप्टेंबर रोची सकाळी ११:०५ वाजता चिपळूण येथून सुटेल. त्याच दिवशी दुपारी ४:१० वाजता ती पनवेल स्थानकावर पोहचेल.
त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०११५९ पनवेल-चिपळूण मेमू विशेष ३ आणि ४ सप्टेंबर रोजी पनवेल स्थानकातून दुपारी ४:४० वाजता रवाना होईल. त्याच दिवशी रात्री ९:५५ वाजता चिपळूण स्थानकावर पोहोचेल. ही विशेष गाडी अंजनी, खेड, कलांबणी बु., दिवाणखवटी, विन्हेरे, करणजडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जीते, आपटा आणि सोमटणे या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे. या गाडीमध्ये एकूण ८ मेमू कोचेस असून, प्रवाशांना अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येईल.