सोनू सूद प्राप्तिकर खात्याच्या रडारवर; मुंबई, दिल्लीतील कार्यालयांसह ६ ठिकाणी तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 05:53 IST2021-09-16T05:53:29+5:302021-09-16T05:53:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली/मुंबई : कोरोना महासाथीच्या काळात हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांचे मूळ गाव गाठण्यासाठी आर्थिक मदतीचा हात ...

actor Sonu Sood on the radar of the Income Tax Department pdc | सोनू सूद प्राप्तिकर खात्याच्या रडारवर; मुंबई, दिल्लीतील कार्यालयांसह ६ ठिकाणी तपासणी

सोनू सूद प्राप्तिकर खात्याच्या रडारवर; मुंबई, दिल्लीतील कार्यालयांसह ६ ठिकाणी तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली/मुंबई : कोरोना महासाथीच्या काळात हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांचे मूळ गाव गाठण्यासाठी आर्थिक मदतीचा हात दिल्याने खऱ्या अर्थाने नायक बनलेला प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांसह सहा ठिकाणांची प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तपासणी केली. या तपासणीमागचे कारण गुलदस्त्यात आहे.   

सोनूचे आर्थिक उत्पन्न, खर्च, गुंतवणूक, त्याचे आर्थिक व्यवहार, हिशेबाची पुस्तके या सगळ्याची पाहणी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली. मुंबईतील पाच ठिकाणी तर सोनूशी संबंधित लखनऊमधील एका कारखान्याची तपासणी प्राप्तिकर खात्याने केली. दरम्यान, सोनू सूदची अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या शैक्षणिक योजनेचा  सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केल्याने त्याचा संबंध या तपासणीत होता का, याविषयीचा तर्क लढवला जात होता.
 

Web Title: actor Sonu Sood on the radar of the Income Tax Department pdc