Sanjay Dutt: संजय दत्त नागपुरमध्ये नितीन गडकरी, नितीन राऊतांना भेटला; कारण गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 15:38 IST2021-06-06T15:36:44+5:302021-06-06T15:38:14+5:30
Sanjay Dutt met Nitin Gadkari: संजय दत्त शनिवारी नागपुरमध्ये होता. त्याने वर्धा रोडवरील गडकरींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गडकरींव्यतिरिक्त संजय दत्तने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचीदेखील भेट घेतली.

Sanjay Dutt: संजय दत्त नागपुरमध्ये नितीन गडकरी, नितीन राऊतांना भेटला; कारण गुलदस्त्यात
बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त (Sanjay dutt) याने नागपुरमध्ये शनिवारी नितीन गडकरींची (Nitin Gadkari) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आज याची माहिती समोर आली आहे. संजय दत्त अचानक गडकरींच्या घरी का गेला, त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. (Sanjay dutt meet Nitin Gadkari, nitin Raut in Nagpur, why?)
संजय दत्त शनिवारी नागपुरमध्ये होता. त्याने वर्धा रोडवरील गडकरींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. संजय दत्तने गडकरींच्या पाया पडून आशिर्वादही घेतले. गडकरींव्यतिरिक्त संजय दत्तने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचीदेखील भेट घेतली.
राऊत यांचा मुलगा आणि सुनेसोबतही त्याने चर्चा केली. राऊतांच्या मुलाचे फेब्रुवारीमध्ये लग्न झाले होते. कोरोना संक्रमणामुळे त्यांनी लग्न साध्या पद्धतीने करून रिसेप्शन रद्द केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील याबाबत त्यांची स्तुती केली होती.
संजय दत्त नागपुरमध्ये खासगी दौऱ्यावर आल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी रात्रीच तो मुंबईला परतला. काँग्रेस प्रवक्ते संजय दुबे यांनी याची माहिती दिली. दुबे यांचा मुलगा गौरव आणि संजय दत्त मित्र आहेत.