शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

मुंबईचा डॉन मन्या सुर्वे माझा भाऊ होता; नाना पाटेकरांनी सांगितलं 'नातं'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:47 PM

राजकारण, समाजकारण, चित्रपट, गुन्हेगारीवर नाना पाटेकरांचं भाष्य

पिंपरी चिंचवड: डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ होता. तो माझ्या मामांचा मुलगा होता, असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केला. पिंपरी चिंचवड कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात नाना पाटेकर ह्यांची प्रकट मुलाखत आज घेण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. नाना पाटेकर यांनी मुलाखतीत राजकारण, समाजकारण, चित्रपट, गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ होता. तो माझ्या मामांचा मुलगा होता, असं नाना पाटेकर म्हणाले. गुन्हेगारीशी संबंधित भूमिकांवर बोलताना नानांनी मन्या सुर्वेचा संदर्भ दिला. कधीकाळी मुंबईत मन्या सुर्वेची दहशत होती. त्याच्या आयुष्यावर बेतलेला शूटआऊट अ‍ॅट वडाला चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी पिंपरी चिंचवडमधल्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 'पिंपरी चिंचवडमध्ये मी एका बांधकामावर मुकादम म्हणून काम केलं आहे. त्यावेळी मी कामगारांचे पगार द्यायचो. त्यामुळे या शहराशी माझे जुने ऋणानुबंध आहेत,' असं नानांनी सांगितलं. त्यांनी येरवड्यातल्या कैद्यांची आठवणदेखील उपस्थितांना सांगितली. येरवड्यात गेल्यानंतर मी 450 खुन्यांना भेटलो. त्यांच्याशी बोललो. प्रत्येकानं क्षणिक रागातून खुनासारखं कृत्य केलं होतं. त्या रागामुळे त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ ते तुरुंगात घालवत होते, असं नाना म्हणाले. प्रत्येकानं रागाचा तो क्षण सांभाळायला हवा, असा सल्ला नानांनी उपस्थितांना दिला.कलाकारांचं आयुष्य आणि त्यातल्या अडचणी, समस्या यावरदेखील नाना पाटेकर मुलाखतीत मोकळेपणानं बोलले. एका भूमिकेत दुसऱ्या भूमिकेत जाताना आम्ही कलाकार म्हणून तुमच्या समोर येत असतो. मात्र हे करताना घरच्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. हे सगळं सुरू असताना मुलं मोठी होत असतात आणि ज्यावेळी आम्ही घरत परततो, तेव्हा आमचा नटसम्राट झालेला असतो, असं म्हणत नाना पाटेकरांनी कलाकारांची व्यथा सर्वसामान्यांसमोर मांडली.  

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकर