विजय वडेट्टीवार, रोहित पवार हे विरोधी पक्षातील सदस्य आहेत, त्यांनी अनेक वर्ष या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून बरेच काही उपक्रम राबवलेले आहेत, त्यांनी ते आरोप केलेले आहेत, आरोप करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आरोप केल्याशिवाय त्यांचे दुकान चालणार नाही. तीन वर्षापासून रॅपीडो स्पॉनरशीप देत आहे. प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर देखील रॅपिडोने बेकायदेशीर काम केले, त्याच्या विरोधात रॅपिडोची बाईक पकडून दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. स्पॉन्सरशिप दिली म्हणजे त्यांनी शासनाला विकत घेतलं का तर तसे अजिबात नाही त्यांनी जर चुकीचं काम केलं तर शासन त्यांच्यावर कारवाई करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ठाण्यात डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर सरनाईक यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. प्रो गोविंदा हा एक खेळ आहे, त्यामुळे यात राजकारण न आणण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या खेळाला पुढे करण्यासाठी वीस, पंचवीस एजन्सीज असून ते गेल्या तीन वषार्पासून प्रो गोविांदाला स्पॉन्सरशिप देत आहेत, उलट प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर रॅपीडोवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच तीन वर्षांपूर्वी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री नव्हता तीन वषार्पासून रॅपिडोस्पॉन्सरशिप देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यंदा त्याचा बाऊ करायची विरोधी पक्षातील सदस्यांना काही गरज नसल्याचा सल्ला दिला.प्रो गोविंदा सारखी स्पर्धा इंटरनॅशनल लेव्हलला जात असतांना त्यात राजकारण आणले जात आहे.
तीन वषार्पासून ही स्पर्धा सुरु असून यात अनेक स्पॉन्सर आहेत, परंतु यापूर्वी का आरोप केले नाहीत असा सवाल करीत स्पॉन्सरशिप दिल्यावर पण आम्ही कारवाई केली बेकायदेशीर काम करणाऱ्यांना प्रताप सरनाईक सोडणार नाही शासन पाठीशी घालणार नाही आम्ही त्या डायरेक्टर वर सुद्धा एफ आय आर दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले. याच्यापुढे ओला असू द्या रॅपिडो असू द्या उबर राहू द्या किंवा कोणी असू द्या एखाद्या खेळाला स्पॉन्सर दिली म्हणजे शासन त्यांनी विकत घेतलेला नाही त्यांनी चुका केल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
रॅपिडो ओला उबर यांसंदर्भात विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या, त्यानुसार ही कारवाई केली होती. स्पॉन्सर असतांनाही कारवाई केली आहे, त्यामुळे आरोप करण्याऐवजी कौतुक करायला हवे असेही ते म्हणाले. या संदर्भात मी माझ्या खात्याकडून स्पष्टीकरण देखील पाठविले आहे. तसेच विरोधकांना एफआरआयच्या कॉपी देखील पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मी विरोधकांना विनंती करतो की जागतिक पातळीवरचा खेळ प्रो गोविंदा झालेला आहे त्याला प्राधान्य दिले पाहिजे, आपले मराठी तरुण त्यामध्ये सहभागी असतात, तुम्ही मराठी तरुणांच्या विरोधात आहात का? मराठी तरुण जागतिक पातळीवर जातोय म्हणून तुम्ही विरोध करताय का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.