शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्रांची कामे रखडवणा-यांवर कारवाई :  विभागीय आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 20:30 IST

शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत तीर्थ क्षेत्र आरखड्यातील देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीमार्ग आणि पालखी तळांच्या विकास कामांची गती वाढवावी : पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

ठळक मुद्देपरस्पर काम बदलणा-या एजन्सी काळ्या यादीतविकासांतर्गत कामांसाठी समन्वयाने चर्चा करून भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश

पुणे : तीर्थ क्षेत्र विकास आरखड्यांतर्गत कोणत्याही कामांना यापुढे कार्योत्तर मंजूरी दिली जाणार नाही, असे करणा-यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल,असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी दिला. तसेच आराखड्यातील कामे परस्पर बदलणा-या एजन्सीची कामे काढून घेवून त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या स्पष्ट सूचनाही संबंधित अधिका-यांना दिल्या. श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखी तळ, मार्ग विकास आराखडाविषयी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, तीर्थक्षेत्र विकासचे विशेष कार्यअधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत तीर्थ क्षेत्र आरखड्यातील देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीमार्ग आणि पालखी तळांच्या विकास कामांची गती वाढवावी.तसेच्य विकास कामांच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवावे,अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी दिल्या.तसेच तसेच पालखीमार्ग, पालखीतळ विकासांतर्गत कामांसाठी समन्वयाने चर्चा करून भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.या बैठकीत पंढरपूर येथील नवीन दिंडी पालखीतळ, शेगाव दुमला रस्ता, दुतर्फा वृक्ष लागवड करणे या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे, तसेच येथील 65 एकर क्षेत्रातील एमटीडीसी च्या पाठीमागील जागेत मुरमीकरण करून प्लॉट पाडणे, सोलापूर जिल्ह्यातील भंडीशेगाव, पिराची कुरोली येथील पालखीत तळाच्या ठिकाणी सेप्टीक टँक बांधणे. तसेच पंढरपूर-पिराची कुरोली या रस्त्याचे सर्वेक्षण करून या कामाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देणे.त्याचप्रमाणे पंढरपूर येथील महात्मा फुले ते गोपाळपूर चौक रस्ता रूंदीकरण व सुधारणा करण्यासाठी विद्युत वाहिनीचे स्थलांतर करणे, पंढरपूर येथील 65 एकर क्षेत्रामध्ये पोलिसांसाठी 6 लोखंडी वॉच टॉवर बांधणे तसेच या ठिकाणच्या प्रवेशव्दाराजवळ उजव्या बाजूला आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे बांधकाम करण्यास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विकास आरखड्यांतर्गत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील उद्यान संरक्षण भिंत बांधणे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनपट आणि ज्ञानेश्वरीवर आधारीत चित्र व ध्वनीफित तयार करणे या कामांच्या प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. ................पालखी तळांवर कायमस्वरूपी स्वच्छतागृह  पालखी तळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे बांधणे तसेच यासाठी निर्मववारी अभियानातील सदस्यांना सहभागी करून घेण्यावर चर्चा झाली. तसेच मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या स्मारक उभारणीचा आढावा घेण्यात आला.यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन मंडपास मिळणा-या स्कायवॉकच्या उभारणीचे सादरीकरण करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिरPandharpurपंढरपूरdehuदेहूAlandiआळंदी