शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपाचे पाट; जयंत पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर अजित पवार म्हणतात त्यापूर्वीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:11 IST

पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गाजलेल्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून एकेकाळचे मित्र असलेले जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात शुक्रवारी आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगलेला पाहायला मिळाला. 

सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवारांनी दोन वेळा भाजपसोबत शपथविधी घेतल्याचा अप्रत्यक्ष दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. स्वतः पंतप्रधानांनीच भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर दोन-तीन दिवसांत आमचा पक्ष वेगळा झाला. २०१९ रोजी दीड-दोन दिवसांचे सरकार होते. त्या सरकारमध्येही काही प्रकल्पांना क्लीन चीट देण्याचे काम झाले, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीने सुरू केलेल्या ‘टू द पॉइंट पॉडकास्ट’ या मुलाखत कार्यक्रमादरम्यान पाटील यांनी हे आरोप केले. खासदार अमोल कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गंभीर असतील तर खोलात जातील?मी १५ वर्षे आघाडी सरकारमध्ये होतो. माझ्यासमोर हा भ्रष्टाचाराचा विषय आला नाही. त्यामुळे मी त्या खोलात कधी गेलो नाही. मात्र, ज्यांनी हे आरोप केले, त्यांच्यावर आता ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. देशाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीने हा आरोप केल्याने ते गंभीर असतील तर याच्या खोलात जातील. त्यांचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे, आता त्यांनी नैतिकता सांभाळली पाहिजे, असा उपरोधिक सल्लाही जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे.

आरोपापूर्वीच भाजपबरोबर जाण्याचा निर्णय : पवार

जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांना अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपात काही तथ्य नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार गेले तेव्हापासूनच भाजपबरोबर जायचे चालले होते. त्यावेळीच सगळ्यांनी याबाबतच्या पत्रावर सह्या करून निर्णय घेतला होता, असा दावा अजित पवार यांनी केला.पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, तेव्हा कुठला आरोप नव्हता. आरोप झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेत अनियमितता झाल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत, असे सांगत पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले. 

जिल्हा नियोजन मंडळात टक्केवारीपुणे जिल्हा नियोजन मंडळात दिलेली कामे दोन वर्षे मंजूर होत नाहीत. मात्र, ठराविक पक्षाच्या लोकांना कामे दिली जातात, असा आपला अनुभव असल्याचे मुलाखतकार कोल्हे यांनी जयंत पाटील यांना विचारले असता, जिल्हा नियोजन मंडळात काही मंत्र्यांकडून टक्केवारी सुरू झाल्याचा आरोप पाटील यांनी केला.या आरोपावर पवारांनी उत्तर दिले. मी पुण्याचा पालकमंत्री आहे. कुणी ०००.१ टक्के मागितले असल्यास दाखवा, राजकारण सोडेन, असे ते म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी