एक्स्प्रेस वेवर दोन ठिकाणी अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 07:05 IST2019-02-24T07:05:21+5:302019-02-24T07:05:38+5:30

साप्ताहिक सुटीच्या दिवशी पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. यामुळे या दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढते. 

accidents occur in two places on Express Way; One killed | एक्स्प्रेस वेवर दोन ठिकाणी अपघात; एक ठार

एक्स्प्रेस वेवर दोन ठिकाणी अपघात; एक ठार

मुंबई : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार झाला आहे. साप्ताहिक सुटीच्या दिवशी पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. यामुळे या दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढते. 


पहिला अपघात खालापूर टोल नाक्याजवळ झाला असून पुण्याला जाणाऱ्य़ा मार्गावर कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा अपघात बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ घडला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बाजुला दोन कारना ट्रेलरची धडक बसल्याने हा अपघात झाला. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. 

Web Title: accidents occur in two places on Express Way; One killed

टॅग्स :Accidentअपघात