शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

Accident: ढोलताशा पथकातील १३ मुले-मुली चालकाच्या डुलकीने मृत्यूच्या खाईत, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटेची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 07:40 IST

Accident News: मुंबईचे ढोल-ताशा पथक घेऊन परतत असताना खासगी बस २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह १३ जण ठार झाले. तर, २९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये  ३ तरुणींचा समावेश आहे.

 खोपोली (रायगड) : मुंबईचे ढोल-ताशा पथक घेऊन परतत असताना खासगी बस २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह १३ जण ठार झाले. तर, २९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये  ३ तरुणींचा समावेश आहे.

चालक वगळता सर्व जण १७ ते २४ वयोगटातील आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराच्या वरच्या खिंडीनजीक पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी चालकाला डुलकी लागल्याने भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुर्घटना घडल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. 

बसमध्ये ६ मुलींसह एकूण ४२ जणांचा समावेश होता. त्यापैकी दोघे खोपोली वगळता अन्य सर्व जण मुंबईतील गोरेगाव परिसरातील आहेत. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आटपून तेथून परतत असताना झोपेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. व्हीलवरील नियंत्रण सुटून भरधाव बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली. 

अपघातातील मृतांची नावे अशी  : जुई सावंत (वय १८, दिंडोशी, गोरेगाव), यश यादव (१७), ढाेलताशा पथकप्रमुख सतीश धुमाळ (वय २३), वीर मांडवकर (१२), वैभवी साबळे (२०), स्वप्नील धुमाळ (१६), मनीष राठोड (२४), कृतिक लोहित (१६), राहुल गोठण (१७), अनिकेत जगताप (२६, सर्व गोरेगाव), हर्षदा परदेशी (१९, माहीम, मुंबई), अभय साबळे (१९, मालाड) व बसचालक हरीरतन सोपान यादव (४०, रा. जोगेश्वरी).

मृतांच्या वारसांना ७ लाखांची मदत राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. मृत्युमुखी पडलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीअंतर्गत प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली.  

मुलांचे मृतदेह पाहून नातलगांचा आक्रोश  मुंबई : जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर शिंग्रोबा खिंडीजवळ झालेल्या अपघातात वीर बाजीप्रभू ढोल- ताशा पथकातील सतीश धुमाळ, स्वप्निल धुमाळ, जुई सावंत, वीर मांडवकर, यश यादव, कृतिक लोहीत, राहुल गोठण यांच्या मृत्यूची वार्ता कळताच  दिंडोशीत शोककळा पसरली. अख्खी वस्ती हळहळली. सर्वत्र शोकाकुल वातावरण होते. तेथे चूलही पेटली नाही. जसजसे मुलांचे मृतदेह घरी आणण्यात आले, तसा नातलगांच्या आक्रोशाने प्रत्येकाचे डोळे पाणावले.    शिवनेरी सहकारी सोसायटीतील राहुल गोटलचा मृतदेह संध्याकाळी त्याच्या घरी आला, तेव्हा आईने हंबरडा ऐकून साऱ्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. नातेवाईक, महिला, परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. राहुलने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. सतीश धुमाळ, स्वप्निल धुमाळ, जुई सावंत, वीर मांडवकर, राहुल गोठण यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार होणार आहेत. यश यादव, कृतिक लोहित यांचे नातेवाईक गावावरून येणार असल्याने त्यांचे मृतदेह जोगेश्वरी ट्रामा सेंटर येथे ठेवण्यात आले आहेत. संतोष नगरपालिका वसाहतीतील के सेक्टर येथील चाळीत राहणाऱ्या वीर कल्पेश मांडवकर या लहानग्याचा मृतदेह सायंकाळी घरी आणला. तेव्हा मामाला दु:ख अनावर झाले. चाळीत सर्वत्र वावरणाऱ्या वीरचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नातलग- मित्रपरिवाराने गर्दी केली होती. आई-वडील गावावरून यायचे असल्याने रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील, असे नातलगांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबई