शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीने ओलांडली शंभरी

By admin | Updated: September 11, 2014 01:11 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबीने) नागपूरने आज लाचखोरांविरुद्ध चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन सापळे यशस्वी केले. आजच्या कारवाईसोबतच एसीबीने कारवाईची शंभरी ओलांडली.

आतापर्यंत १०२ कारवाया : १३१ लाचखोर अडकले नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबीने) नागपूरने आज लाचखोरांविरुद्ध चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन सापळे यशस्वी केले. आजच्या कारवाईसोबतच एसीबीने कारवाईची शंभरी ओलांडली. तसेच जानेवारी ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत एसीबीने १३१ लाचखोर जेरबंद केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाचखोरांविरुद्धच्या कारवाईचा हा आकडा दुप्पट आहे. एसीबीचा नागपूर विभाग यावर्षी लाचखोरांविरुद्ध कमालीचा आक्रमक झाला आहे. भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी एसीबीचे स्थानिक अधिकारी कमालीचे सक्रिय झाले आहेत. १ जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत नागपूर एसीबीने एकूण १०० लाचेचे सापळे यशस्वी केले. आज दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विश्वास सलामे यांना १५ हजारांची लाच घेताना तर, सायंकाळी गडचिरोली येथील एसटीचे विभाग नियंत्रक विनोद चौरे यांना पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याबरोबरच एसीबीच्या यावर्षीच्या कारवाईचा आकडा १०२ वर पोहोचला. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ५१ कारवाया करण्यात आल्या होत्या. लाचखोरांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तक्रारदारांनी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा आणि लाचखोरांची माहिती द्यावी, असे आवाहन एसीबीचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)भ्रष्टाचारात महसूल विभाग अव्वल लाचखोरीत महसूल विभाग अव्वलस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसीबीने या विभागातील १९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले. दुसऱ्या स्थानावर पोलीस आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे. कारण पोलीस विभागातील १५ अधिकारी, कर्मचारी आणि तेवढेच अधिकारी, कर्मचारी जिल्हा परिषद-पंचायत समितीचे लाच घेताना सापडले. वीज मंडळ तिसऱ्या स्थानावर (१० लाचखोर) तर शिक्षण विभाग लाचखोरीत चौथ्या स्थानावर (८ लाचखोर) आहे. आरोग्य विभागाचे चार, महापालिका तीन, आरटीओ दोन आणि अन्य काही विभागाचेही दोन, एक असे अधिकारी, कर्मचारी कारवायात अडकले.