'सामना'च्या अग्रलेखात गलिच्छ भाषा, रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार: चंद्रकांत पाटील

By जयदीप दाभोळकर | Published: January 1, 2021 01:36 PM2021-01-01T13:36:02+5:302021-01-01T13:40:56+5:30

Chandrakant Patil : औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं आपण म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

abusive language in the Saamana editorial will write a letter to Rashmi Thackeray says Chandrakant Patil | 'सामना'च्या अग्रलेखात गलिच्छ भाषा, रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार: चंद्रकांत पाटील

'सामना'च्या अग्रलेखात गलिच्छ भाषा, रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार: चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्देसंपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून रश्मी ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याची पाटील यांची माहितीमुंबई महानगरपालिका निवडणुकांवरही केलं भाष्य

काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. 

"मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावानं लागतो," असं पाटील म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती भाषा रश्मी ठाकरे या संपादिका असलेलं संपादकीय असूच शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

मुंबई मनपावरही भाष्य

"मुंबई महानगरपालिका ही काही जणांची जहागीर झाली. अनेक राज्यकर्त्यांनी त्या त्या वेळी मुंबई महानगरपालिका त्यांना राहू दे असं म्हटलं. त्याच्यातून पैसे निर्माण करत, राजकारण करत आता अशी वेळ आली आहे की मुंबईकरांच्या नागरी समस्या आता बाजूला राहिल्या आहेत. राजकारणात मजबूत होण्याचाही प्रयत्न करू लागले. या अनैसर्गिक सरकारमध्ये ते आता ही मजबूतीही घालवून बसणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसहित २०२२ मध्ये अनेक निवडणुका आहेत त्या जिंकणं आमचं लक्ष्य आहे," असंही पाटील म्हणाले.

 

Web Title: abusive language in the Saamana editorial will write a letter to Rashmi Thackeray says Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.