शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

बेताल वक्तव्याने आगडोंब; टीव्हीवरून माफी मागा! नूपुर शर्मा यांना न्यायालयाने फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 10:23 AM

वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : तुमच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देशात आगीचा भडका उडाला. देशात जे काही घडले त्यासाठी तुम्ही एकट्या जबाबदार आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या वक्तव्यांबद्दल साऱ्या देशाची टीव्हीवरूनच तात्काळ माफी मागितली पाहिजे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देत भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना जोरदार फटकारत त्यांची याचिका सुनावणीस घेण्यास नकार दिला.

वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व एफआयआर एकत्रित करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका नूपुर शर्मा यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठाने नूपुर शर्मा यांना याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. 

या खंडपीठाने म्हटले आहे की, नूपुर शर्मा यांनी सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा राजकीय हेतूने अथवा कुटिल कारवायांचा भाग म्हणून बेताल वक्तव्ये वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात केली व त्यामुळे साऱ्या देशात आगडोंब उसळला. 

एका विशिष्ट धर्माबद्दल नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात देशभरात  निदर्शने करण्यात आली. तसेच या वक्तव्यांविरोधात आखाती देशांनीही संताप व्यक्त केला. त्यामुळे भाजपने नूपुर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या एका टेलरची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवरही सर्वोच्च न्यायालयाचा शुक्रवारचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?- नूपुर शर्मा यांनी केलेली वक्तव्ये ही अतिशय अस्वस्थ करणारी व गर्विष्ठपणाची- अशी वक्तव्ये करण्याचे त्यांना कारणच काय होते? - त्यामुळे देशात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. - अशी वादग्रस्त वक्तव्ये करणारे लोक अजिबात धार्मिक नसतात. त्यांना इतर धर्मांबद्दल आदर नसतो.- पक्षप्रवक्त्यांना वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा परवाना मिळालेला नाही- ...तर अँकरविरोधात एफआयआर दाखल करायला हवा.-अंथरला असेल.

वक्तव्यानंतर...२७ मे : नूपुर शर्मा यांनी एका विशिष्ट धर्माबद्दल वक्तव्य.१ जून : नूपुर यांच्याविरोधात तक्रार दाखल३ जून : वादग्रस्त वक्तव्यामुळे कानपूरमध्ये हिंसाचार४-५ जून : अनेक देशांकडून वादग्रस्त वक्तव्याचा निषेध५ जून : नूपुर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले

आम्हाला तोंड उघडायला लावू नका : कोर्टवादग्रस्त उद्गारांप्रकरणी  दिल्ली पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीला नूपुर शर्मा सर्व सहकार्य देत आहेत असे त्यांचे वकील मणिंदर सिंग यांनी सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, दिल्ली पोलीस करत असलेल्या तपासातून आतापर्यंत काय निष्पन्न झाले? आम्हाला आता तोंड उघडायला लावू नका. दिल्ली पोलिसांनी नूपुर शर्मा यांच्यासाठी लाल गालिचाच अंथरला असण्याची शक्यता आहे असेही ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. 

‘ती’ वक्तव्ये आम्ही पाहिली आहेत...शर्मा यांच्या जिवाला धोका आहे, असा युक्तिवाद त्यांचे वकील मणिंदर सिंग यांनी न्यायालयात केला होता. त्यावर नूपुर यांच्या जिवाला धोका आहे की त्यांच्यापासूनच सुरक्षेला धोका आहे असा सवालही खंडपीठाने विचारला. वृत्तवाहिनीवरील चर्चेत शर्मा यांनी केलेली प्रक्षोभक वक्तव्ये आम्ही पाहिली आहेत असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

पक्षप्रवक्त्यांनी वादग्रस्त विधाने करू नयेत -एखादी व्यक्ती राजकीय पक्षाची प्रवक्ता असेल तर त्याचा अर्थ त्याला वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा परवाना मिळालेला नाही. जर वृत्तवाहिनीवरील चर्चेचा दुरुपयोग झाला असे नूपुर शर्मा यांना वाटत असेल तर त्यांनी अँकरविरोधात एफआयआर दाखल करायला हवा होता. - न्यायालय 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपा