शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Video : “…तर माझा अर्ज जाणारच, आमदार-खासदारांच्या संपर्कात"; अभिजित बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 00:36 IST

राष्ट्रपती होणं किंवा पंतप्रधान होणं हे सर्व करून दाखवायचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान हे चहावाले, मी पेढेवाला हा मोठा फरक आहे - अभिजित बिचुकले

सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवारीवरून चर्चांच्या फैरी सुरू आहेत. परंतु अशातच आता आणखी एक नाव राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे आणि ते नाव म्हणजे अभिजित बिचुकले यांचं. “हे सत्य आहे. मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी खासदारांशी सह्या देण्यासंदर्भात बोलत आहे. मी बहुजन समाजातील आहे, अतिशय निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती आहे हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं. परंतु त्यावेळी त्यांनी कोणीतरी कोविंदसाहेब शोधून आणले आणि त्यांना देशाचं राष्ट्रपतीपद दिलं. त्यांना बहुमतामळे ते जमलं,” असं बिचुकले म्हणाले.

“आता माझा असा एक डावपेच सुरू आहे, आपल्या न्यायपालिका असतील, केंद्रातील निर्णय असतील, त्या सिस्टम राष्ट्रपतीपदाची जी ताकद आहे या सगळ्या ताकदी राष्ट्रपतीपदाच्या दबावाखाली असतात. म्हणून त्या पदावरून योग्य निर्णय घेऊ शकत नाही. राष्ट्रपतींनी बऱ्याच गोष्टी देशासाठी करायच्या आहेत. पण त्या करत नाहीत, म्हणून मी देशातील आमदार, खासदार यांच्याशी बोलतोय. सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज १०० टक्के जाणार. अर्ज जोवर मी भरत नाही तोवर मला गुपित ठेवायचं होतं,” असंही बिचुकले म्हणाले. लोकमतशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी आपण राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं.आमदार खासदारांचं अनुमोदन मिळणं गरजेचं आहे. ही गोष्ट अवघड आहे. ते पक्षाशी बांधीलही असतात. त्यांना व्हिप असतं, चमचेगिरी करण्यात पटाईत आहेत. हा अर्ज भरण्यात जरी मी यशस्वी झालो नाही तरी पुढच्या राजकारणातून मी लांब गेलो नाही, असंही ते म्हणाले. भारताच्या राष्ट्रीय राजकारणात मी आहेच असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती होणं किंवा पंतप्रधान होणं हे सर्व करून दाखवचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान हे चहावाले, मी पेढेवाला हा मोठा फरक आहे. त्यांना कौटुंबीक जीवनातलं काही माहिती नाही. त्यांना घर चालवायची माहिती नाही संविधानामुळे पंतप्रधान होतात. ते संविधान मला लढण्याची शक्ती देतं, मी लढत राहणार असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी