शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 21:16 IST

वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर भाजपनेही जुने दाखले देत उलट सवाल केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याला मंजुरी दिली. आरती साठे यांनी भाजपच्या प्रवक्त्या म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र, त्यांनी नंतर राजीनामा दिला. आता त्याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या नियुक्तीवर टीका सुरू केली आहे. त्याला भाजपकडून जुने दाखल देत उत्तर देण्यात आला. 'काँग्रेसवाल्यांनोरोहित पवार आता याचे उत्तर द्या', असे आव्हानच भाजपने दिले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबई उच्च न्यायालयात रिक्त झालेल्या जागांवर तीन वकिलांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने याला मंजुरी दिली. न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या तीन व्यक्तींमध्ये एक नाव वकील आरती साठे यांचेही आहे. त्याच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केल्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर देत उलट सवाल केला.  

"आरती साठेंचा आणि भाजपचा काही संबंध नाही" 

रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले, "भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर दीड वर्षांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून आरती साठे यांची नियुक्ती झाली. त्यांचा व भाजपाचा काहीही आता संबंध नाही. न्यायमूर्तींच्या कॉलेजियमच्या निर्णयानुसार केलेल्या नियुक्तीवर काँग्रेस पक्ष व रोहित पवार टीका करत आहे. काँग्रेसवाल्यांनो व रोहीत पवार आता याचे उत्तर द्या", असे आव्हान देत त्यांनी जुने दाखले दिले. 

भाजपने कोणाचे उदाहण दिले?

केशव उपाध्ये म्हणाले, "न्या. बहरूल इस्लाम हे काँग्रेस तर्फे एप्रिल 1962 मध्ये राज्य सभेवर निवडून गेले. 68 मध्येही ते राज्य सभेवर निवडून गेले. या काळात त्यांनी आसाम विधानसभा निवडणूक ही लढवली होती पण ते पराभूत झाले. 1972 मध्ये त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. मार्च 1980 मध्ये ते निवृत्त झाले आणि पुन्हा राजकारणात सक्रीय झाले."

"निवृत्त झाल्यावर इंदिरा गांधी सरकारने त्यांना डिसेंबर 1980 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केले. 1983 मध्ये त्यावेळचे बिहार चे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची भ्रष्टाचार खटल्यात निर्दोष मुक्तता केल्यानंतर टीका झाल्यावर त्यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 1983 मध्येच काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर नियुक्त केले", असे म्हणत केशव उपाध्ये यांनी विरोधकांना उत्तर दिले. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टBJPभाजपाcongressकाँग्रेसRohit Pawarरोहित पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय