ZP Election 2026: अर्ज छाननीवेळी 'आप'च्या उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:41 IST2026-01-23T12:40:34+5:302026-01-23T12:41:34+5:30

अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले

AAP candidate dies of heart attack during application scrutiny The incident took place near Devrukh Tehsil Office | ZP Election 2026: अर्ज छाननीवेळी 'आप'च्या उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

ZP Election 2026: अर्ज छाननीवेळी 'आप'च्या उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

देवरूख (जि. रत्नागिरी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीदरम्यान आम आदमी पार्टीचे उमेदवार सुजित गणपत सुर्वे (वय ५८) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. हा प्रकार गुरुवारी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख तहसील कार्यालयासमाेर घडला. त्यांनी धामणी पंचायत समिती गणातून अर्ज दाखल केला हाेता.

गुरुवारी देवरूख तहसील कार्यालयात अर्जांची छाननी सुरू असतानाच सुर्वे यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सुजित सुर्वे हे संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक गावचे रहिवासी होते. त्यांचे पार्थिव मुंबई येथे नेऊन उशिरा रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title : चुनाव जांच के दौरान आप उम्मीदवार की दिल का दौरा पड़ने से मौत

Web Summary : रत्नागिरी में ज़ेडपी चुनाव जांच के दौरान, आप उम्मीदवार सुजीत सुर्वे, 58, की दिल का दौरा पड़ने से मौत हो गई। वह देवरुख तहसील कार्यालय में गिर गए और अस्पताल में उन्हें मृत घोषित कर दिया गया। सुर्वे ने धामनी पंचायत समिति से नामांकन दाखिल किया था। उनका अंतिम संस्कार मुंबई में किया गया।

Web Title : AAP Candidate Dies of Heart Attack During Election Scrutiny

Web Summary : During ZP election scrutiny in Ratnagiri, AAP candidate Sujit Surve, 58, died of a heart attack. He collapsed at Deorukh Tehsil office and was declared dead at the hospital. Surve had filed nomination from Dhamani Panchayat Samiti. His last rites were performed in Mumbai.