वेगानं येणाऱ्या मुंबई-पुणे शिवशाहीला टोल नाक्यावर अपघात, बस कंटेनरवर धडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 13:42 IST2022-07-30T13:41:39+5:302022-07-30T13:42:30+5:30
जखमींमध्ये लहान मुलीचाही समावेश.

वेगानं येणाऱ्या मुंबई-पुणे शिवशाहीला टोल नाक्यावर अपघात, बस कंटेनरवर धडकली
भालचंद्र जुमलेदार
मुंबईहून पुण्याकडे निघालेली ही शिवशाही बस टोल नाका समोर असताना देखील अत्यंत वेगात आली. त्याला कंट्रोल करणे चालकाला शक्य झाले नाही. दरम्यान, वेगात असलेली ही बस कंटेनरला ती धडकली. त्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली.
या बसमध्ये वीस एक प्रवासी होते. अपघात होता क्षणीच टोलनाक्यावर असलेले कर्मचारी आणि तेथील सुरक्षा यंत्रणा मदतीसाठी धावली. त्यामधील एकूण सहा प्रवासी जखमी आहेत, त्यापैकी एक लहान मुलगी आहे. सर्वांच्या वर प्राथमिक उपचार केले असून त्यांना पुढील उपचारासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले आहे. तसेच अपघातग्रस्त बस क्रेनने बाजूला घेतलेली आहे.