शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

इवलासा कीटक सांगतो मृत्यूची वेळ; फॉरेन्सिक सायन्ससाठी महत्त्वाचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 08:42 IST

पुण्यातील झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधकाची माहिती

श्रीकिशन काळेपुणे - विज्ञान, तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे शोधले जाते. मृत्यूच्या वेळेचा अंदाजही बांधला जातो. मात्र, आता मृत्यूची अचूक वेळ शोधणे अधिक सोपे होणार आहे. तेही ‘ओमोरगस खान्देशी’ या कीटकामुळे. खान्देशमध्ये नुकताच ‘ओमोरगस खान्देशी’ या नव्या कीटकाचा शोध लागला. हा शोध फॉरेन्सिक सायन्ससाठी महत्त्वाचा ठरणार आहे.  

या कीटकाला ‘केराटीन बिटल’ असेही म्हटले जाते. शरीराचे विघटन होत असताना, सुरुवातीच्या अवस्थेत प्रथम तिथे माशा येतात. त्यानंतर तिथे केराटिन फीडर्स येतात. यामुळे फॉरेन्सिक सायन्समध्ये त्यांचे महत्त्व आहे. झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वेस्टर्न रिजनल सेंटरमधील संशोधक अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांचे या कीटकाविषयीचे संशोधन न्यूझीलंडच्या झूटॅक्सा या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे वेरनर स्ट्रम्पफेर यांनी सहकार्य केले.हा कीटक खान्देशमध्ये आढळून आला आहे. त्याचा नमुना १९२२मध्ये ब्रिटिशांनी संकलित केला होता. तो ओळख नसलेल्या किड्यांच्या संग्रहात ठेवलेला होता. अपर्णा कलावटे यांनी त्यावर संशोधन केले.

मातीत लपणारा कीटकट्रोगिडे या कीटकांच्या कुटुंबातील हा एक आहे. त्यांना जमिनीखाली लपणारे कीटक असेही म्हटले जाते. कारण यांचा रंग मातीत मिसळणारा म्हणजे विटकरी असतो. त्यामुळे ते शक्यतो लवकर दिसून येत नाहीत. आता ट्रोगिडे या कुटुंबात एकूण १४ प्रजातींचा समावेश झाला आहे.

या बीटलवर खूप संशोधन झालेले नाही. त्यामुळे त्याविषयी वैज्ञानिक माहितीचा अभाव आहे. हे बीटल प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या घरट्याशेजारी आढळून येतात. ब्रिटिशांनी १९२२मध्ये या बीटलचा नमुना जतन करून ठेवला होता. तो आतापर्यंत ओळख नसलेल्या यादीत होता. त्यावर मी अभ्यास करून त्याच्यावरील संशोधन आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रसिद्ध केले. - अपर्णा कलावटे, कीटक संशोधक, पुणे विभागीय कार्यालय, झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाश