कुणबी नोंदीसाठी नव्याने कार्यकक्षा, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आठवडाभरात हाेणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:43 IST2024-01-02T13:41:39+5:302024-01-02T13:43:56+5:30
निजामकालीन कागदपत्रांमधील नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती हैदराबादमध्ये गेली होती. याविषयीची कागतपत्रे उर्दूत असून तेलंगणा सरकारच्या गोदामांत धूळखात पडली होती.

कुणबी नोंदीसाठी नव्याने कार्यकक्षा, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आठवडाभरात हाेणार बैठक
मुंबई : मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने दोन अहवाल सादर केले आहेत. तिसरा अहवाल समिती लवकरच सादर करणार आहे, मात्र समितीची मुदत संपली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याच आठवड्यात बैठक होणार असून समितीची मुदत व कार्यकक्षा नव्याने ठरणार आहे.
निजामकालीन कागदपत्रांमधील नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती हैदराबादमध्ये गेली होती. याविषयीची कागतपत्रे उर्दूत असून तेलंगणा सरकारच्या गोदामांत धूळखात पडली होती.
या कागदपत्रांचे भाषांतर करण्यासाठी भाषांतरकाराची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे तपासण्यासाठी किमान तीन-चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्याचबरोबर सरकारने या कागदपत्रांसाठी तेथील सरकारशी संपर्क साधावा व प्रती काढून घ्याव्यात. राज्य शासनाने तेलंगणा सरकारशी संपर्क साधून ही कागदपत्रे ताब्यात घ्यावीत किंवा त्याच्या अधिकृत प्रती काढून घ्याव्यात, अशी शिफारस शिंदे समितीने आपल्या दुसऱ्या अहवालात केली आहे; मात्र समितीची मुदत संपली आहे.