शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि विषयाची सखोल तयारी करून निर्णय घेणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:49 IST

Ajit Pawar Death News: अजितदादा आणि माझी पहिली भेट मी पुण्याचा जिल्हाधिकारी असताना झाली. त्या काळात अजित पवार हे केवळ एक कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नव्ह. राज्याच्या राजकारणातही तेव्हा ते फारसे सक्रिय नव्हते. तरीसुद्धा, पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास, प्रश्नांची सखोल जाण आणि काम करून दाखवण्याची तीव्र इच्छा स्पष्टपणे जाणवत होती. 

- अजित निंबाळकर(राज्याचे माजी मुख्य सचिव, अध्यक्ष, सारथी)अजितदादा आणि माझी पहिली भेट मी पुण्याचा जिल्हाधिकारी असताना झाली. त्या काळात अजित पवार हे केवळ एक कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नव्ह. राज्याच्या राजकारणातही तेव्हा ते फारसे सक्रिय नव्हते. तरीसुद्धा, पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास, प्रश्नांची सखोल जाण आणि काम करून दाखवण्याची तीव्र इच्छा स्पष्टपणे जाणवत होती. ते राज्यमंत्री झाल्यानंतर आमच्या भेटी व्हायला लागल्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय कसा असावा, हे मी त्या काळात जवळून अनुभवले. पुढे मी राज्याचा मुख्य सचिव असताना आमच्या भेटी अधिक सातत्याने होत राहिल्या. प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि विषयाची सखोल तयारी करून निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख तेव्हा अधिक ठळक झाली.

जलसंधारणासारख्या तांत्रिक, गुंतागुंतीच्या विषयाचा अभ्यास, स्पष्ट भूमिका आणि वेगवान निर्णयक्षमता हे त्यांचे गुण प्रशासनावरची पकड मजबूत ठेवण्यास कारणीभूत ठरले. तेव्हा अजित पवार जलसंधारणमंत्री होते.  

मी ‘वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ॲथॉरिटी’चा चेअरमन असताना आमचे कार्यालय ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये होते. ती जागा ‘सीकॉम’च्या मालकीची होती आणि सुरुवातीला ती जागा देण्यास सीकॉम तयार नव्हती. सरकारने मार्केट रेटनुसार ती जागा घेण्याची तयारी दर्शवली, तेव्हा व्यवहाराची रक्कम सुमारे ३५ कोटी रुपये होती. त्यावेळी अजित पवार स्वतः कार्यालयात आले आणि अवघ्या २४ तासांच्या आत सर्व संबंधित यंत्रणांना सोबत घेऊन त्या निधीची व्यवस्था केली. त्याक्षणी त्यांच्या काम करण्याच्या वेगाचा, निर्णयक्षमतेचा व प्रशासकीय समन्वयाचा मला खरा अंदाज आला. कॅबिनेटमध्ये ते प्रत्येक विषयावर पूर्ण तयारीनिशी आपली बाजू मांडत. कोणतेही काम वेळेत आणि अपेक्षित गुणवत्तेने पूर्ण व्हावे, यासाठी  अत्यंत आग्रही असतात. प्रशासनावर इतकी प्रभावी पकड असलेला नेता मी माझ्या प्रदीर्घ सेवाकाळात फारच क्वचित पाहिला.

‘सारथी’ संस्थेच्या कामात त्यांनी विशेष लक्ष दिले. हे केवळ एका खात्याचे किंवा पक्षाचे काम नसून समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे, अशी त्यांची भूमिका होती. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांनी हे काम स्वतःकडे घेतले. पुण्यात सेनापती बापट रोडवर जागा मिळवण्यापासून ते सारथीची भव्य इमारत उभी राहीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वैयक्तिक लक्ष दिले. मी सारथीचे अध्यक्षपद स्वीकारावे, ही त्यांचीच इच्छा होती. अजित पवार हे केवळ राजकारणी नव्हे, तर काम करून दाखवणारे, प्रशासनाला दिशा देणारे नेतृत्व होते. आज हे नेतृत्व आपल्यात नाही, ही राज्याची मोठी हानी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar: Strong administrator, decisive leader with deep subject knowledge.

Web Summary : Ajit Pawar, a leader with strong administrative control and in-depth knowledge, impressed with his decisiveness and speed in resolving issues. He ensured timely completion of projects and significantly contributed to 'Sarathi' institute's development, demonstrating exceptional leadership.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र