शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना निर्णय स्वातंत्र्य देणारा धडाडीचा नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:56 IST

Ajit Pawar Death News: पुण्यातील शासकीय इमारतींचा कायापालट करण्याचा चंग अजितदादांनी बांधला होता, त्याचा मी साक्षीदार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी आणि कालबाह्य इमारत पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक, प्रशस्त इमारत उभारण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला, तेव्हा मी जिल्हाधिकारी होतो.

- चंद्रकांत दळवी(माजी सनदी अधिकारी अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था)पुण्यातील शासकीय इमारतींचा कायापालट करण्याचा चंग अजितदादांनी बांधला होता, त्याचा मी साक्षीदार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी आणि कालबाह्य इमारत पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक, प्रशस्त इमारत उभारण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला, तेव्हा मी जिल्हाधिकारी होतो. प्रस्ताव सादर केल्यानंतर केवळ तीन महिन्यांतच ६० कोटी रुपयांचा निधीही दिला. या इमारतीची उभारणी करताना पुढील किमान पन्नास वर्षांचा विचार करून नियोजन करण्यात यावे, असा त्यांचा आग्रह  होता.  नवी इमारत प्रशस्त, उंच, आधुनिक आणि राज्यातील इतर जिल्हाधिकारी कार्यालयांपेक्षा वेगळी व उठावदार असावी, यासाठी वास्तुविशारद व तज्ज्ञांकडून आलेले अनेक प्रस्ताव त्यांनी बारकाईने अभ्यासले. ही इमारत केवळ भव्य नसून हरित (ग्रीन) इमारत असावी, ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक साहित्य आणि नागरिकांना सोयीस्कर ठरणारी रचना असावी, यावरही त्यांनी भर दिला.

पुणे हे राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्तालय यांच्यासह शहरातील विविध आयुक्तालयांसाठीही स्वतंत्र, आधुनिक इमारती असाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय, सहकार आयुक्तालय, कृषी आयुक्तालय तसेच अन्य विभागांच्या इमारतीदेखील सुसज्ज, देखण्या आणि दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन उभारण्यात याव्यात, असा स्पष्ट दृष्टिकोन त्यांनी मांडला. इमारतींच्या उभारणीत गुणवत्तेवर कोणतीही तडजोड न करता त्या सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी वापरल्या जाव्यात, असे ते नेहमीच सांगत असत.

अजितदादा ऊर्जामंत्री असताना मी ऊर्जा विभागात उपसचिव म्हणून मुंबईत कार्यरत होते. वीज हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने अनेक मंत्री निर्णय घेताना सावध भूमिका घेत. मात्र, अजित पवार यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर वीजचोरी, वीज गळती आणि थकबाकी वसुली या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर कठोर; पण आवश्यक निर्णय घेतले. प्रत्येक विभागाला शून्य गळती, शंभर टक्के वसुली आणि शंभर टक्के वीजचोरी रोखणे या उद्दिष्टांवर काम करण्याचे स्पष्ट आदेश  दिले. त्याच वेळी अधिकाऱ्यांना निर्णय स्वातंत्र्य, मोकळीक आणि आवश्यक तेवढा पाठिंबाही दिला.अजित पवार यांचा वक्तशीरपणा, कामातील शिस्त आणि स्पष्ट निर्णयक्षमता ही कायमच प्रशासकीय वर्तुळात वाखाणण्याजोगी राहिली आहे. दूरदृष्टी, गुणवत्ता आणि लोकहित या तीन सूत्रांवर आधारित त्यांची कार्यपद्धती पुण्यासह राज्याच्या विकासात महत्त्वाची ठरली, हे निश्चित!

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar: A decisive leader empowering officers with decision-making freedom.

Web Summary : Ajit Pawar championed modern infrastructure and empowered officers. He prioritized quality, citizen convenience, and efficient governance. As Energy Minister, he tackled power theft and revenue collection, fostering accountability and support for officials.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र