तुमच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलेन्स टाकलाय, पुराव्यांसह उघड करणार; दमानियांना राष्ट्रवादीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:50 IST2025-02-21T11:43:55+5:302025-02-21T11:50:23+5:30

स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू, असा इशारा देण्यात आला आहे.

A balance of Rs 25 crore has been deposited in your account will be revealed with evidence NCP warns Anjali Damania | तुमच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलेन्स टाकलाय, पुराव्यांसह उघड करणार; दमानियांना राष्ट्रवादीचा इशारा

तुमच्या खात्यावर २५ कोटींचा बॅलेन्स टाकलाय, पुराव्यांसह उघड करणार; दमानियांना राष्ट्रवादीचा इशारा

Anjali Damania: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून वारंवार होणाऱ्या विविध आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीकारक बाबींबद्दल दमानिया यांच्याविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली असतानाच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही दमानिया यांना आक्रमक इशारा दिला आहे.

"धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर २५ खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला १५ देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू," असा इशारा सूरज चव्हाण यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

दमानियांच्या आरोपावर मुंडेंचं स्पष्टीकरण काय?

कृषी खात्यातील कथित घोटाळ्यावरून अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना धनंजय मुंडेंनी म्हटलंय की, "बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आणि सोलर लाईट ट्रॅप यांचा पुरवठा करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयावर अंजली दमानिया यांनी केलेले दावे हे संपूर्णपणे चुकीचे, खोटे व केवळ माझी बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित आहेत. मुख्य सचिव तथा मंत्रिमंडळ सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांची मान्यता झाल्यानंतर दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त निर्गमित केलेले आहे. त्यामध्ये कृषी विभागाच्या खरेदी व थेट पुरवठ्याला मान्यता देण्यात आलेली आहे. तो पेपर सोबत पोस्ट करत आहेत. ज्याला त्या तारीख नसलेले सहीचे पत्र म्हणतात ते वास्तविकत: मंत्री, कृषी म्हणून स्वतःच्या विभागाच्या सचिवांना निर्गमित केलेले टिपण आहे. टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही तथापि सदर टिपणावर ते ज्याला मार्क केलेले आहे त्याची स्वाक्षरी व त्याला प्राप्त झाल्याचा व कार्यासनात प्राप्त झाल्याचा दिनांक नमूद असतो. विशेष म्हणजे या शासन निर्णयान्वये व मंत्रिमंडळ निर्णयान्वये मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही. त्याची प्रक्रिया सुरू आहे. दमानिया ताई यांनी नेहमीप्रमाणे अर्धवट कागदपत्रांच्या आधारे जे आरोप केलेले आहेत ते संपूर्णतः खोटे व फक्त मीडिया ट्रायल करण्यासाठी आहेत," असा दावा मुंडे यांनी केला आहे.
 

Web Title: A balance of Rs 25 crore has been deposited in your account will be revealed with evidence NCP warns Anjali Damania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.