शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शिंदेंच्या गटात 9, ठाकरेंकडे उरले फक्त 5 मंत्री, जाणून घ्या कुणाच्या गटात कोणते मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 6:52 AM

शिवसेनेतील बंडानंतर यातील तब्बल ९ मंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह एकूण १५ मंत्रिपदे आहेत. मात्र, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एक मंत्रिपद रिक्त असल्याने सध्या शिवसेनेकडे १४ मंत्री आहेत. यात शिवसेनेने आपल्या कोट्यातून ३ अपक्ष आमदारांना मंत्रिपद दिले होते. मात्र, आता शिवसेनेतील बंडानंतर यातील तब्बल ९ मंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.  

उदय सामंत शिंदेंच्या गटातअगदी कालपर्यंत शिवसेनेसोबत असलेले आणि राष्ट्रीय कार्यकारिणीलाही उपस्थिती लावलेले कॅबिनेट मंत्री उदय सामंत हे रविवारी थेट गुवाहाटी गाठत एकनाथ शिंदेंच्या गटात डेरेदाखल झाले.  

दोन मंत्री विधानसभेतीलउद्धव ठाकरेंना समर्थन असलेल्या मंत्र्यांपैकी आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव लोकांमधून निवडून आलेले मंत्री आहेत. तर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले अपक्ष आमदार शंकरराव गडाख हेही विधानसभा सदस्य आहेत.

शिंदे यांच्यासोबत असलेले मंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मतदारसंघ : कोपरी-पाचपाखाडी, ठाणे)

उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण मतदारसंघ : रत्नागिरी) 

संदीपान भुमरे -  रोजगार हमी, फलोत्पादन मतदारसंघ : पैठण, जि. औरंगाबाद

गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता मतदारसंघ : जळगाव ग्रामीण)

दादा भुसे - कृषी, माजी सैनिक कल्याण मतदारसंघ : मालेगाव बाह्य, नाशिक 

शंभूराज देसाई -(राज्यमंत्री) गृह (ग्रामीण) मतदारसंघ : पाटण, जि. सातारा

अब्दुल सत्तार - (राज्यमंत्री) महसूल मतदारसंघ : सिल्लोड, जि. औरंगाबाद

बच्चू कडू - (राज्यमंत्री) जलसंपदा मतदारसंघ : अचलपूर, जि. अमरावती

राजेंद्र यड्रावकर - (राज्यमंत्री) मतदारसंघ : शिरोळ, जि. कोल्हापूर

ठाकरे यांच्यासोबत असलेले मंत्री -उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) - सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय, खाती (विधान परिषद सदस्य)

आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार (विधानसभा सदस्य) मतदारसंघ : वरळी, मुंबई

शंकरराव गडाख - मृदा व जलसंधारण (शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री) मतदारसंघ : (विधानसभा सदस्य)   नेवासा, जि. अहमदनगर)   

सुभाष देसाई -उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा(विधान परिषद सदस्य)

अनिल परब -परिवहन, संसदीय कामकाज (विधान परिषद सदस्य)

कोणत्या प्रदेशातील कोण कोणाकडे? - उत्तर महाराष्ट्रातील कृषिमंत्री दादा भुसे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदेंसोबत आहेत. मराठवाड्याचा विचार करता रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही शिंदेंबरोबर आहेत. - शिंदे यांच्यासोबत असलेल्या दोन मंत्र्यांपैकी बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे असून अमरावती जिल्ह्यातील आहेत. राज्यमंत्री असलेले अपक्ष राजेंद्र यड्रावकर यांनी केव्हाच शिंदे गट गाठला आहे. माजी मंत्री व कोकणातील मोठे नेते आ. दीपक केसरकर आधीच शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. - उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख असे चौघे आता ठाकरे यांच्यासोबत आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे ठाण्याचे म्हणजे मुंबई-कोकण भागातील आहेत. ठाकरे यांच्यासोबत असलेल्या चारपैकी आदित्य व गडाख हे विधानसभा सदस्य आहेत. उद्धव व परब हे परिषदेवर आहेत. बालेकिल्ला ढासळलामुंबई ठाण्यापाठोपाठ मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, पण तेथील दोन्ही मंत्री ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले. विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही, पण आधी वनमंत्री असलेले संजय राठोड हे शिंदे यांच्यासोबत आहेत. विदर्भातील नितीन देशमुख वगळता एकही शिवसेना आमदार आज ठाकरे यांच्यासोबत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हे शिवसेनेचे आमदार आणि आशिष जयस्वाल व नरेंद्र भोंडेकर हे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार देखील शिंंदेंसोबतच आहेत. शिवसेनेच्या १४ मंत्र्यांपैकी ९ म्हणजे ६५ टक्के मंत्री हे शिंदे गटात आहेत. ३५ टक्के मंत्री ठाकरे यांच्यासोबत उरले आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना