शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

 सरकारकडून समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी : राधाकृष्ण विखे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 20:52 IST

मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकरी पीक विमा योजनेचा खरी लाभार्थी रिलायन्स कंपनी कृषी पुरस्कार मिळालेल्यांची व्याख्याने संशोधकांसमोर ठेवणे गरजेचेनसीम खान यांच्यावर पैशांची उधळण केल्याचा प्रकार चुकीचाकेंद्र आणि राज्य सरकार खोटे आकडे सांगण्यात आणि आकड्यांचा खेळ खेळण्यात माहीर

पुणे : मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीचे नाव देखील माहीत असून योग्य वेळ आल्यानंतर ते जाहीर करणार आहे, असे ते म्हणाले.        आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपांचे पुढे काय झाले? तसेच समृद्धी महामागार्बाबत झालेल्या प्रकाराच्या सर्वांच्या मागे कोण आहे, असा सवालही त्यांनी केला. भाजप सरकार राज्यात सत्ता येऊन चार वर्ष झाली. त्या दरम्यान त्यांनी सिंचन प्रकल्पावर किती काम केले. याची श्वेतपत्रिका काढावी. अशी मागणी देखील त्यांनी केली.       काँग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान पैशांची उधळण केली जात असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण केल्याचा प्रकार योग्य नाही. असे प्रकार होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.      नैसर्गिक आपत्तींपासून शेतक-यांना संरक्षण मिळावे, शेतक-यांना सुरक्षितता वाटावी, यासाठी शासनाकडून शेतकरी पीक विमा योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा खरा लाभार्थी रिलायन्स कंपनी आहे. शेतक -याच्या नावावर विमा कंपनीचे हित जपले जात आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. सरकारकडून शेतक-यांसाठी राबविण्यात आलेल्या पीक विमा योजनेचा आत्तापर्यंत ४ हजार कोटी रुपये विमा प्रिमीयम भरला आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतक-यांना केवळ १ हजार ६०० कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे विमाकंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा फायदा झाला असून त्यातील सर्वाधिक वाटा हा रिलायन्स इंन्शुरन्स कंपनीला मिळाला आहे. त्यामुळे ही योजना शेतक-यांसाठी आहे, की विमा कंपन्यांसाठी, हेच कळत नाही.       काँग्रेस सरकारच्या काळात महसुलात १८ टक्के वाढ होती. या सरकारच्या काळात हा आकडला ११ टक्के झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकार खोटे आकडे सांगण्यात आणि आकड्यांचा खेळ खेळण्यात माहीर आहे. यातून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, असाही आरोप विखे पाटील यांनी केला.जलयुक्त शिवार योजनेवर टिकास्त्र सोडत विखे-पाटील म्हणाले, जलयुक्त नव्हे झोल युक्त शिवार योजना आहे. कृषिसाठी विभागवार वेगवेगळे धोरण असणे गरजेचे आहे. कृषी पुरस्कार मिळालेल्यांची व्याख्याने संशोधकांसमोर ठेवणे गरजेचे आहे. सरकारमधील आमदार, खासदार, मंत्री फक्त शेतक-यांच्या बाजूने बोलतात, कृती मात्र शेतक-याच्या विरोधात काम करतात, असा टोलाही विखे पाटील यांनी सत्ताधा-यांना लगावला. 

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गBJPभाजपाcongressकाँग्रेस