Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 09:38 IST2025-06-15T09:36:28+5:302025-06-15T09:38:20+5:30

Mumbra-Sheel buildings demolished: मुंब्रा-शीळ भागातील खान कंपाउंड परिसरातील बेकायदेशीर इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारपासून कारवाई सुरू केली.

8 more buildings demolished in Mumbra-Sheel area | Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!

Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!

ठाणे : मुंब्रा-शीळ भागातील खान कंपाउंड परिसरातील बेकायदेशीर इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारपासून कारवाई सुरू केली आहे. शनिवारी आणखी आठ इमारती जमीनदोस्त केल्या. शुक्रवारी पाच इमारतींवर कारवाई केली होती. एकूण १७ अनधिकृत इमारतींपैकी १३ इमारतींवर कारवाई केली आहे. काही इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असल्याने कारवाईत अडथळा निर्माण झाला होता. येथे ९ मजल्यापर्यंत इमारती उभ्या केल्या आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत मुंब्रा-शीळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ आणि १८०, शीळ येथील १७ अनधिकृत इमारतींच्या एका प्रकरणावर सुनावणी झाली होती. ज्या इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य नाही, अशा इमारतींवर शनिवारी कारवाई करण्यात आली. या इमारती २०२४ मध्ये एका मागून एक उभ्या राहिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोणाचा आशीर्वाद मिळाला? 
१७ इमारतींपैकी काही इमारती या ४ ते ५ मजल्यांच्या, तर काही ९ मजल्यांपर्यंतच्या आहेत. प्रत्येक मजल्यावर चार ते सहा फ्लॅट आहेत. काही इमारती पाचव्या मजल्यावर स्लॅब टाकून पुढे बेकायदा मजले उभारले. या इमारती कोणी उभारल्या, त्याला राजकीय आशीर्वाद कोणाचा मिळाला, पालिकेतील सहायक आयुक्त, परिमंडळ उपायुक्त किंवा अन्य एकाही अधिकाऱ्याला या इमारती उभ्या राहत असताना दिसल्या नाहीत का, असा सवाल उपस्थित झाला.

Web Title: 8 more buildings demolished in Mumbra-Sheel area