शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

मारणे याच्या कोठडीत ८ दिवसांची वाढ

By admin | Updated: December 19, 2014 01:53 IST

नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे खूनप्रकरणी अटक गज्या मारणे याने गुन्ह्याचे नियोजन करून आरोपींना हत्यारे, अग्निशस्त्र, वाहने पुरवली होती.

पुणे : नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे खूनप्रकरणी अटक गज्या मारणे याने गुन्ह्याचे नियोजन करून आरोपींना हत्यारे, अग्निशस्त्र, वाहने पुरवली होती. तसेच, गुन्ह्यात निष्पन्न झालेली ३ अग्निशस्त्रे वापरानंतर पुन्हा विल्हेवाटीसाठी मारणेकडे जमा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गजानन पंढरीनाथ मारणे (वय ४९, रा. हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरूड ) व रूपेश कृष्णराव मारणे (वय ३१, रा. कोथरूड) यांची गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांची २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढविली. या प्रकरणी यापूर्वी अटक असणाऱ्या १३ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी संतोष कांबळे (वय २७, रा. दत्तवाडी) याने फिर्याद दिली आहे. मारणे टोळीने २९ नोव्हेंबर रोजी भर दिवसा वैकुंठ स्मशानभूमीजवळ घायवळ टोळीतील तिघांवर खुनी हल्ला केला होता. त्यात अमोल बधे याचा मृत्यू झाला होता; तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. गज्या मारणे व रूपेश मारणे यांनी फरार काळात लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड विकत घेतले आहे का, अगर बनावट नावाने मोबाईल हॅन्डसेट घेतला आहे का, याचा पुराव्याकामी तपास करायचा आहे. गुन्ह्याच्या स्थळावरून फरार होण्यासाठी कोणाची वाहने वापरली, ती जप्त करायची आहेत. फरार असताना दोघे आरोपी हे पुणे जिल्हा आणि राज्याबाहेर गेल्याचे सांगत आहेत. फरार असताना त्यांना कोणी मदत केली. सागर राजपूत, राकेश गायकवाड, तानाजी कदम, निखिल दुगाई यांचा शोध घ्यायचा आहे. टोळीच्या वर्चस्वातून त्यांनी आणखी कोठे शस्त्राचा साठा करून ठेवला आहे का, याबाबत तपास करायचा आहे, यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली.