राज्यभर साजरा करणार लालपरीचा ७१ वा वर्धापन दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:00 AM2019-06-01T03:00:54+5:302019-06-01T06:12:04+5:30

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत

The 71th anniversary of the Red Sea celebrations will be celebrated throughout the state | राज्यभर साजरा करणार लालपरीचा ७१ वा वर्धापन दिन

राज्यभर साजरा करणार लालपरीचा ७१ वा वर्धापन दिन

googlenewsNext

मुंबई : राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. शनिवारी १ जून रोजी एसटीचा ७१ वा वर्धापन दिन आहे. राज्यातील सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या ५६८ बसस्थानकांवर हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. 

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही मंत्री रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई अशा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा ७१ वा वर्धापन दिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम
एसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही सोहळा करण्यात येणार असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनपर कार्यक्रमानंतर नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचे अभिनंदन आणि सत्कार तसेच सेवाज्येष्ठ एसटी कर्मचारी आणि उल्लेखनीय कामगिरी करीत सेवा बजावणाºया कर्मचाºयांचा सत्कार या वेळी करण्यात येणार आहे. या वेळी एसटीच्या चित्ररथाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

Web Title: The 71th anniversary of the Red Sea celebrations will be celebrated throughout the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.