शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

अबब..! कृष्णा नदीतून वाहिले तब्बल ६०० टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 12:30 IST

भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली.

ठळक मुद्देकृष्णा-भीमा खोऱ्यात उदंड पाऊस :धरणे भरल्यानंतर भीमा नदीतून सोडले बारा पानशेतचे पाणीपुणे शहराची तब्बल सहा वर्षे तहान भागवू शकेल इतके पाणी कोयना मावते धरणात

विशाल शिर्केपुणे : पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणे पाणी पिऊन तृप्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून देण्यात आले. तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल सहा कोयना धरणे भरतील इतके पाणी कृष्णेत सोडण्यात आले. त्यातील तब्बल पाच कोयना धरणांचे पाणी कोल्हापूर-महाबळेश्वरच्या घाटरांगांमधून कृष्णेत आले.भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली. राज्यात उजनी धरणाची एकूण साठ्याची क्षमता सर्वाधिक ११७.४७ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. तर, कोयना धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता सर्वाधिक १०० टीएमसी आहे. पुणे शहराची तब्बल सहा वर्षे तहान भागवू शकेल इतके पाणी कोयना धरणात मावते. कृष्णा खोऱ्यातील घाटमाथ्यावर ऑगस्टच्या सुरुवातीस झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यातील कराडमधे पूरस्थिती उद्भवली होती. लाखो लोकांना स्थलांतरीत करावे लागले. कोट्यवधीरुपयांचे नुकसान या जिल्ह्यांत झाले. कृष्णेच्या प्रमुख उपनद्यांपैकी असलेल्या कोयना, दूधगंगा, पंचगंगा, वारणा या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी कृष्णेत जमा झाले होते. कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोयना धरणासह धोम, वारणावती, दूधगंगा, राधानगरी, ऊरमोडीसह १३ प्रमुख धरणे आहेत. यात सध्या २०८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. येरळवाडी धरणात ०.४७ टीएमसी (६७ टक्के) पाणी आहे. हा अपवाद वगळता सर्व धरणात गुरुवार अखेरीस (दि. ५) ९५ ते १०० टक्के पाणीसाठा होता. ही धरणे भरल्यानंतरही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. कृष्णेत यंदाच्या मॉन्सूनमधे राजापूर बंधाऱ्यातून ४२० टीएमसी पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणात गेले. तर, दूधगंगा नदीतून जवळपास ८० टीएमसी पाणी कृष्णेत पोहचले. म्हणजेच तब्बल ५०० टीएमसी अतिरिक्त पाणी कृष्णेतून पुढे आंध्रप्रदेशाकडे वाहिले. भीमा नदीच्या खोऱ्यातही यंदा जोरदार वृष्टी झाली. या खोºयातील २३ धरणांपैकी माणिकडोह, मुळशी, पवना, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरसह १८ धरणांचे पाणी उजनी नदीत येते. उजनी धरणाची क्षमता ११७ टीएमसी असून, त्यात ५३.५७ उपयुक्त आणि ६३.६५ मृतसाठा आहे. जून महिन्यात धरणातील मृतसाठा देखील उणे होता. एकट्या,खडकवासला साखळीतील धरणातून ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान २२.५० टीएमसी पाणी उजनीत जमा झाले. जिल्ह्यातील धरणातील पाण्याने उजनी धरण पूर्ण भरल्यानंतर तब्बल ७० टीएमसी पाणी भीमेत सोडण्यात आले.  

टॅग्स :PuneपुणेDamधरणriverनदीRainपाऊस