मुंबई : ऐन दिवाळीत लालपरीच्या सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांदी दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन वाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला.
एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंसह परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध कर्संचारी चमघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वेतन फरक देण्यासाठी ६५ कोटी मंजूर : प्रतापराव सरनाईकसर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून, यासाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांनादेखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी : शिंदेयावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
Web Summary : ST employees will receive a Diwali gift of ₹6,000 and arrears. The government approved ₹65 crore monthly for salary differences and ₹12,500 Diwali advance for eligible employees. This decision aims to ensure a joyous Diwali for ST workers despite challenging circumstances and boost corporation's financial health.
Web Summary : एसटी कर्मचारियों को 6,000 रुपये का दिवाली उपहार और बकाया मिलेगा। सरकार ने वेतन अंतर के लिए मासिक 65 करोड़ रुपये और पात्र कर्मचारियों के लिए 12,500 रुपये दिवाली अग्रिम को मंजूरी दी। इस निर्णय का उद्देश्य चुनौतीपूर्ण परिस्थितियों के बावजूद एसटी श्रमिकों के लिए एक आनंदमय दिवाली सुनिश्चित करना है।