ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:57 PM2020-06-02T18:57:46+5:302020-06-02T21:50:04+5:30

त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेतली असून, काही निर्णय घेतले आहेत.

6 important decisions of Thackeray cabinet, all citizens will get the benefit of Mahatma Phule Janaarogya Yojana vrd | ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ

ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ

Next

मुंबई- देशात कोरोनाचं भयंकर संकट असून, त्याचा महाराष्ट्रालाही सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्यानं प्रशासनही हतबल झालं आहे. प्रशासनानं कोरोनाला थोपवण्यासाठी उपाययोजना राबवल्या असल्या तरी त्या तोकड्या परत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेतली असून, काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. जन आरोग्य योजनेच्या सर्व अंगीकृत रुग्णालयात याचा फायदा घेता येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हे निर्णय घेतले आहेत. 

ठाकरे मंत्रिमंडळातील सहा महत्त्वाचे निर्णय

• राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ 

• निसर्ग चक्रीवादळ: वादळाची तीव्रता लक्षात घेऊन किनारपट्टीवरील जिल्ह्यातील लोकांना आपापल्या घरांतच थांबण्याचे आवाहन. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर 

 • मुंबई उच्च न्यायालय विधि समिती व उपसमितीसाठी सचिव पदाच्या निर्मितीस मान्यता. मुंबईसह नागपूर आणि औरंगाबाद साठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन पदांची निर्मिती.

 • ठाणे येथे एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापना.न्यायालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस देखील मान्यता.

* मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्तीबाबत 

* डीएमआयसी प्रकल्पातील दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी एमआयडीसी विकासक

हेही वाचा

CoronaVirus : राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये आरोपित ‘PFI’वर मुंबई पालिकेची मर्जी कशासाठी?, फडणवीसांचा 'बाण'

PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला

लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य

CoronaVirus : दिलासादायक! राज्यात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले, २३६१ कोरोनाग्रस्तांची नोंद

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय

CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

Read in English

Web Title: 6 important decisions of Thackeray cabinet, all citizens will get the benefit of Mahatma Phule Janaarogya Yojana vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.