शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
3
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
4
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
5
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
6
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
7
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
8
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
9
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
10
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
11
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
12
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
13
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
14
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
15
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
17
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
18
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
19
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
20
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

५७ लाख नोंदी सापडल्या, पण वारस शोधणे कठीण! तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 07:37 IST

Maratha Reservation: मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या. नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याचे मोठे आव्हान आहे.

मुंबई  - मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या. नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याचे मोठे आव्हान आहे. प्रत्यक्षात नोंदी सापडल्या असल्या तरी नोंदीनुसार त्याचे वारस आणि वंशावळी सापडणे कठीण जात असून यासाठी आता सरकारने तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली आहे. 

ही समिती चार महिन्यांसाठी असून वंशावळी जुळविण्याचे काम समितीवर सोपविण्यात आले आहे. ज्या व्यक्तींची वंशावळ जुळते  त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र  निर्गमित करण्यात यावेत, असे निर्देश या समितीला देण्यात  आले आहेत.  

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सहाय्यक संशोधक अधिकारी, ऊर्दू भाषा व मोडी लिपी तज्ज्ञ तर सदस्य सचिव म्हणून नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

- सापडलेले महसुली पुरावे हे सन १८६० ते १९४७ या कालावधी दरम्यानचे असून त्यामध्ये नागरिकांचे नाव व वडिलांचे नाव नमूद असून त्यासमोर आडनावाचा उल्लेख नाही, त्यामुळे वर्तमानात अर्जदारास वंशावळ सिद्ध करण्यात अडचण येत आहे.- पूर्वी नागरिकांनी त्यांच्या मूळ गावातील जमिनींची विक्री केल्याने किंवा इतर कारणांमुळे गाव सोडून स्थलांतरित झाल्याने आता त्या नोंदीची वंशावळ जुळवणे कठीण.- सापडलेल्या महसुली नोंदीचा आजच्या अर्जदाराच्या पिढीशी संबंध प्रस्थापित करण्यात बऱ्याच वेळा सबळ पुरावे उपलब्ध होत नाहीत, परिणामी केवळ अर्जदाराच्या शपथपत्राच्या आधारे निर्णय घ्यावा लागत आहे.

दीडशेहून अधिक तज्ज्ञ नेमण्याचे आदेश३६ जिल्ह्यांसाठी ७२ सहाय्यक संशोधन अधिकारी आणि १४४ उर्दू व मोडी लिपीतज्ज्ञ भरण्याचे आदेश आज देण्यात आले आहेत. समितीच्या कामासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येईल. ही समिती जातीच्या नोंदी उपलब्ध झालेल्या व्यक्तींच्या मागील, समांतर व पुढील वंशावळी शक्य तितक्या मर्यादेपर्यंत जुळविण्याचे काम करेल. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार