शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार रुग्ण

By admin | Updated: August 17, 2014 00:51 IST

देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते,

‘एमएचसीआय-एआरओआय-२०१४’ : पहिल्यांदाच एकत्र आले कर्करोग विकीरण तज्ज्ञनागपूर : देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते, अशी माहिती डॉ. बी.के. मोहंती यांनी दिली.महाराष्ट्र चॅप्टर अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया एआरओआय याच्यावतीने दोन दिवसीय ‘एमएचसीआय-एआरओआय-२०१४’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते. या परिषदेच्या निमित्ताने नागपुरात पहिल्यांदाच कर्करोग विकीरण तज्ज्ञ एकत्र आले होते.डॉ. मोहंती म्हणाले, पुरुष व महिलांमध्ये अन्ननलिकेचा कॅन्सरचा क्रमांक पाचवा लागतो. हा कॅन्सर वयाच्या ४० ते ५० व्या वर्षी सर्वात जास्त दिसून येतो. याची भयानकता म्हणजे साधारण ८० टक्के रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. अशावेळी उपचार करणे कठीण जाते. या मागील कारण म्हणजे, जेव्हा रुग्णाला अन्न गिळणे फार कठीण जाते तेव्हाच तो डॉक्टरकडे जातो. यातच अनेक सामान्य डॉक्टर अशा रुग्णांना छाती किंवा घशाचा संसर्ग म्हणून उपचार करतात. यामुळे रुग्ण ‘अ‍ॅडव्हॉन्स स्टेज’ला पोहचतो. याचे निदान ‘इंडोस्कोपी’ व ‘सिटी स्कॅन’मधून होते. वयाच्या ४० व्या वर्षी ज्यांना अन्न किंवा पाणी गिळणे कठीण जात असेल, वजन कमी झालेले असेल, थकवा वाटत असेल, ताप येत असेल अशांनी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. अतितैलिय पदार्थ, लोणची व मसाल्याच्या पदार्थांच्या सेवनाने हा कॅन्सर होतो. महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमी हेही या आजाराला कारणीभूत ठरते. अत्याधुनिक ‘लिनियर एक्सिलेटर’ची गरजडॉ. व्ही. कन्नन म्हणाले, २०३० पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये २०० ते ३०० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. येत्या १५ वर्षात जगातील ५० टक्के कॅन्सरचे रुग्ण ब्राझिल, रशिया, भारत व चीन या देशात आढळून येऊ शकतात. कॅन्सरची लागण झाल्याचे तपासणीत निदान झाल्यानंतर यावरील उपचारासाठी अत्याधुनिक लिनियर एक्सिलेटरची गरज भासते. दुर्दैवाने भारतात फक्त ३० शहरांमध्येच ही मशीन आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण आहेत. परंतु नागपुरातही ही मशीन नाही. यामुळे येथील रुग्णांना मुंबई, पुणे गाठावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाढते रुग्ण व त्यांची आर्थिक स्थिती पाहता भारतात ही मशीन दर ३० किलोमीटरवर असणे आवश्यक आहे. ‘साईड इफेक्ट’चे प्रमाण कमीडॉ.बी.सी.गोस्वामी व डॉ. उमेश महंतशेट्टी यांनी सांगितले, ‘लिनियर एक्सिलेटर’मध्येही आता अ‍ॅडव्हॉन्स टेक्नालॉजी आल्याने रेडिएशन देताना साईड इफेक्टचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ‘कोबाल्ट युनिट’ बंद करावे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आजही ‘कोबाल्ट’चा वापर सुरू आहे. आहे त्या मशीनचा चांगल्यात चांगला वापर केल्यास त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो, असेही ते म्हणाले. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी व प्रसिद्ध आॅन्कोलॉजिस्ट डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)