“NCP-शिंदेसेनेचे ५० आमदार भाजपात प्रवेश करणार, वेट अँड वॉच”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:59 IST2026-04-02T11:58:22+5:302026-04-02T11:59:55+5:30

Sanjay Raut News: सुनेत्रा पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष यांना विलीन व्हावे लागेल, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

50 MLA of ncp shinde sena will join bjp wait and watch sanjay raut sensational claim | “NCP-शिंदेसेनेचे ५० आमदार भाजपात प्रवेश करणार, वेट अँड वॉच”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

“NCP-शिंदेसेनेचे ५० आमदार भाजपात प्रवेश करणार, वेट अँड वॉच”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील २५-३० आमदार आणि शिंदेसेनेतील २५ आमदार असे सुमारे ५० च्या आसपास आमदार भाजपात प्रवेश करतील. भविष्यात या घडामोडी घडताना दिसतील. वेट अँड वॉच, असा मोठा दावा उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे म्हटले जात आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सदर दावा केला.

वारंवार हेच सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्रा पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत. नवीन रचनेत सुनेत्रा पवारांचे ते सहकारी असतील असे नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीत दुसऱ्या पक्षाने का बोलावे हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिले, कोणती पद दिले हा त्यांचा विषय आहे. पण भविष्यामध्ये या पक्षातील २५-३० आमदारांसह हा पक्ष भाजपामध्ये विलीन होईल. त्याचे नेतृत्व कुणाकडे असेल हे आताच सांगत नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

शिंदेसेनेचेही आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत

पुढील काही काळात शिंदेसेनेतील २५ आमदार हे भाजपामध्ये जातील. हे आमदार भाजपामध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच असे सांगण्यात आले आहे. सुनेत्रा पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष यांना विलीन व्हावे लागेल, असे राऊतांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पक्ष आणि निशाणी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा पुढे केली आहे. यावरही संजय राऊतांनी टीका केली. तसेच निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.

 

Web Title : एनसीपी, शिंदे सेना के 50 विधायक भाजपा में शामिल होंगे: संजय राउत

Web Summary : संजय राउत का दावा है कि एनसीपी और शिंदे सेना के 50 विधायक भाजपा में शामिल हो सकते हैं। उन्होंने एनसीपी के भीतर आंतरिक मुद्दों और संभावित विलयों का सुझाव दिया। उन्होंने चुनाव आयोग की भी आलोचना की।

Web Title : 50 NCP, Shinde Sena MLAs to join BJP: Sanjay Raut

Web Summary : Sanjay Raut claims 50 MLAs from NCP and Shinde Sena may join BJP. He suggests internal issues within NCP and potential mergers are factors. He also criticized the Election Commission regarding ongoing court cases.