राणांविरुद्ध ५० कोटींचा दावा ठोकणार - बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 09:22 IST2022-10-29T09:21:57+5:302022-10-29T09:22:27+5:30

Bachchu Kadu : राणा यांच्या आरोपाची ईडी चौकशी व्हावी. मी चौकशीला तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.  

50 crore suit will be filed against Rana - Bachchu Kadu | राणांविरुद्ध ५० कोटींचा दावा ठोकणार - बच्चू कडू

राणांविरुद्ध ५० कोटींचा दावा ठोकणार - बच्चू कडू

अमरावती/नागपूर : गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर केला. त्यामुळे राणा यांच्याविरुद्ध ५० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती कडू यांनी शुक्रवारी अमरावतीत दिली. तसेच शनिवार, २९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात नोटीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नागपुरात ते म्हणाले, भाजप नेत्यांचे समन्वयासाठी फोन आले. मात्र, पुन्हा राणा यांनी ट्वीट करून उचकवण्याचा प्रयत्न केला. आता ही आरपारची लढाई आहे. माझे राजकारण चुलीत गेले तरी चालेल. १ तारखेला ट्रेलर दाखवू. १५ दिवसांत पिक्चर पूर्ण करू. राणा यांच्या आरोपाची ईडी चौकशी व्हावी. मी चौकशीला तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.  

खोके घेतले की नाही, हे अगोदर स्वत:च आमदार बच्चू कडू यांनी ईडी किंवा सीबीआय चौकशी करून घ्यावी, तेव्हा सत्य बाहेर येईल. नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर दिले जाईल. 
- रवी राणा, आमदार, बडनेरा

Web Title: 50 crore suit will be filed against Rana - Bachchu Kadu